Join us

पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप! कराची बाजारातील व्यवहार अचानक बंद; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 14:17 IST

operation Sindoor effect : भारताने ओपरेशन सिंदूर राबवल्यानंतर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला सर्वात मोठा धक्का बसला आहे. कराची स्टॉक एक्सचेंज आज ७.५ टक्क्यांनी घसरला आहे.

operation Sindoor effect : भारताच्या वाटेला जाणं पाकिस्तानला महागात पडलं आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला अवघ्या १५ दिवसांत गुडघ्यावर आणलं आहे. आधी सिंधू पाणी करार रद्द केला, नंतर अटारी बॉर्डर बंदू करुन व्यापार थांबवला. बुधवारी रात्री ओपरेशन सिंदूर राबवत राहिलेली कसर भरुन काढली. सर्व बाजूंनी झालेल्या आघातानंतर पाकिस्तानची अवस्था केविलवाणी झाली आहे. याचे परिणाम शेअर बाजारात झाले नसते तर नवल वाटलं असतं. भारतीय लष्कराच्या पाकिस्तानवरील क्षेपणास्त्र हल्ल्याच्या भीतीने कराची शेअर बाजार जोरदार कोसळला आहे. आजही कराची स्टॉक एक्सचेंज ७.५ टक्क्यांनी घसरला आहे. नाईविलाजास्तव बाजारातील व्यवहार थांबवण्यात आले आहेत.

पाकिस्तानच्या शेअर बाजारात व्यवहार थांबवलेमंगळवारीही पाकिस्तानचा कराची स्टॉक एक्सचेंज निर्देशांक ११३,५६८.५१ अंकांवर बंद झाला. भारतीय सैन्याने दहशतवादी छावण्यांवर केलेल्या हल्ल्यानंतर, सकाळी शेअर बाजार उघडण्यापूर्वीच जगाला ही बातमी कळली होती. सकाळी केएसई १०० निर्देशांक ५.८३ टक्क्यांनी घसरून १०७,००७.६८ वर उघडला. दुसरीकडे भारतीय शेअर बाजार हिरवळ कायम आहे.

वाचा - द्वेषाचं बीज उखडून फेकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? कुठून घेतलं शिक्षण? काय मिळतात सुविधा?

पाकिस्तानने पायावर धोंडा मारुन घेतलासध्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. सरकार चालवण्यासाठी देखील कर्ज काढवे लागत असल्याची स्थिती आहे. अशात सुधारत असलेला पाकिस्तानी शेअर बाजार पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा घसरत आहे. सार्वभौम क्रेडिट रेटिंग अपग्रेड आणि जागतिक तेलाच्या किमतींमध्ये घसरण यामुळे पाकिस्तानमधील बाजारातील आत्मविश्वास सुधारत होता. गेल्या वर्षी, पाकिस्तानच्या शेअर बाजाराने २२ वर्षांतील सर्वाधिक परतावा दिला, ज्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांकडून पुन्हा रस निर्माण झाला होता. पण, भारताने हल्ला केल्यानंतर रात्रीत स्थिती बदलली आहे. विक्रीचा दबाव वाढल्याने मार्केटमध्ये भूकंप आला आहे. 

टॅग्स :ऑपरेशन सिंदूरपहलगाम दहशतवादी हल्लापाकिस्तानदहशतवादी हल्ला