Iran war cost the US : अमेरिका आणि इराणमधील अनेक वर्षांचा तणाव आता एका भीषण युद्धात रूपांतरित झाला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेले 'ऑपरेशन एपिक फ्युरी' किमान चार ते पाच आठवडे चालण्याचे संकेत दिले आहेत. या लष्करी मोहिमेमुळे केवळ इराणचेच नुकसान होत नाहीये, तर अमेरिकेच्या तिजोरीवरही अब्जावधी डॉलर्सचा बोजा पडत आहे. या युद्धामुळे जागतिक तेल बाजार आणि संरक्षण बजेटवर होणाऱ्या परिणामांनी अर्थतज्ज्ञांची चिंता वाढवली आहे.
काय आहे 'ऑपरेशन एपिक फ्युरी'? २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एका व्हिडिओद्वारे इराणविरुद्धच्या मोठ्या लष्करी मोहिमेची अधिकृत घोषणा केली. पेंटागॉनने या मोहिमेला 'ऑपरेशन एपिक फ्युरी' असे नाव दिले असून, त्याचे मुख्य उद्दिष्ट इराणची अण्वस्त्रे मिळवण्याची क्षमता आणि मिसाइल इंडस्ट्री पूर्णपणे नष्ट करणे हे आहे.
आतापर्यंतची हानी अमेरिकेने इराणमधील १,२५० हून अधिक लक्ष्यांवर हल्ले केले असून ११ इराणी जहाजे नष्ट केली आहेत. तेहरानमधील संकुलावर झालेल्या हल्ल्यात सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचा मृत्यू झाला असून, सोमवारपर्यंत ५५५ लोकांचा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे.
खर्चाचा डोंगर ३३ अब्ज डॉलर्स पार! ब्राऊन युनिव्हर्सिटीच्या २०२५ च्या 'कॉस्ट्स ऑफ वॉर' अहवालानुसार, ७ ऑक्टोबर २०२३ पासून अमेरिकेचा मध्यपूर्वेतील लष्करी खर्च गगनाला भिडला आहे:
- इस्राईलला मदत : २१.७ अब्ज डॉलर्स.
- इतर मोहिमा (येमेन/इराण) : ९.६५ ते १२.०७ अब्ज डॉलर्स.
- एकूण खर्च : ३१.३५ ते ३३.७७ अब्ज डॉलर्स आणि हा आकडा दर तासाला वाढत आहे.
अत्याधुनिक शस्त्रप्रणालींचा वापर अमेरिकन सेंट्रल कमांड या मोहिमेसाठी २० हून अधिक प्रगत शस्त्रप्रणालींचा वापर करत आहे. यामध्ये हवाई दल, नौदल आणि भूदल अशा तिन्ही दलांचा समावेश असून १,००० हून अधिक लक्ष्यांवर अचूक हल्ले करण्यात आले आहेत. इराणची आक्रमक क्षमता लवकरात लवकर संपवणे हा या मोहिमेचा मुख्य लष्करी हेतू आहे.
वाचा - अमेरिका-इराण युद्धादरम्यान सोने-चांदीच्या किमती ३ ते ८% पर्यंत घसरणार? तज्ज्ञांनी सांगितलं कारण
अमेरिकेपुढील आर्थिक आणि राजकीय पेच लष्करीदृष्ट्या अमेरिका प्रबळ असली तरी, हे युद्ध लांबल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील.
- बजेटवर ताण: संरक्षण बजेटचा मोठा हिस्सा या युद्धात खर्ची पडल्याने इतर कल्याणकारी योजनांवर परिणाम होऊ शकतो.
- तेल बाजार: इराणवरील हल्ल्यांमुळे जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होऊन इंधनाचे दर भडकण्याची भीती आहे.
- राजकीय विरोध: युद्धाचा खर्च अब्जावधी डॉलर्सने वाढल्यास अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणात ट्रम्प प्रशासनाला विरोधाचा सामना करावा लागू शकतो.
Web Summary : US 'Operation Epic Fury' against Iran strains the US treasury, costing billions. Attacks on Iranian targets and infrastructure have escalated expenses. The conflict impacts global oil markets and the US defense budget, raising economic concerns.
Web Summary : ईरान के खिलाफ अमेरिकी 'ऑपरेशन एपिक फ्यूरी' से अमेरिकी खजाने पर दबाव बढ़ रहा है, जिससे अरबों का खर्च आ रहा है। ईरानी लक्ष्यों और बुनियादी ढांचे पर हमलों ने खर्च बढ़ा दिया है। संघर्ष का वैश्विक तेल बाजारों और अमेरिकी रक्षा बजट पर असर पड़ रहा है, जिससे आर्थिक चिंताएं बढ़ रही हैं।