Oil Producing Countries: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारावर मोठा परिणाम होत असून, तेल पुरवठ्याबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. विशेषतः हॉर्मुज सामुद्रधुनी (Strait of Hormuz) येथे शेकडो तेलवाहू जहाजे अडकून पडल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. या मार्गातून जगातील सुमारे 20 टक्के तेल वाहतूक केली जाते.
या पार्श्वभूमीवर Global Firepower चा अहवाल समोर आला असून, त्यात जगातील प्रमुख तेल उत्पादक देशांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.
अमेरिका अव्वल, मध्यपूर्व देशांचा दबदबा कायम
अहवालानुसार, अमेरिका तेल उत्पादनात पहिल्या क्रमांकावर असून, तेथे दररोज सुमारे 2,09,53,000 बॅरल तेल उत्पादन होते. दुसऱ्या क्रमांकावर सौदी अरेबिया (11,174,000 बॅरल/दिवस) तर तिसऱ्या स्थानावर रशिया (10,879,000 बॅरल/दिवस) आहे.
कॅनडा (5,688,000 बॅरल/दिवस) चौथ्या आणि चीन (4,984,000 बॅरल/दिवस) पाचव्या क्रमांकावर आहेत. इराक (4,448,000 बॅरल/दिवस) सहाव्या स्थानावर आहे.
सातव्या क्रमांकावर ब्राझील (4,221,000 बॅरल/दिवस), आठव्या स्थानावर संयुक्त अरब अमिरात (4,146,000 बॅरल/दिवस), नवव्या स्थानावर इराण (4,112,000 बॅरल/दिवस) आणि दहाव्या क्रमांकावर कुवैत (2,910,000 बॅरल/दिवस) आहे.
भारत 21व्या स्थानावर
या यादीत भारत 21व्या क्रमांकावर असून, देशात दररोज सुमारे 82,200 बॅरल तेल उत्पादन होते. यावरून भारताची ऊर्जा गरज मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून असल्याचे स्पष्ट होते.
तेल उत्पादनाचा अर्थव्यवस्था आणि संरक्षणावर प्रभाव
तज्ज्ञांच्या मते, तेल उत्पादन हे केवळ अर्थव्यवस्थेसाठीच नव्हे तर देशाच्या संरक्षण क्षमतेसाठी आणि जागतिक प्रभावासाठीही महत्त्वाचे आहे. उद्योग, वाहतूक आणि लष्करी यंत्रणा मोठ्या प्रमाणावर तेलावर अवलंबून असल्याने ऊर्जा सुरक्षितता ही प्रत्येक देशासाठी अत्यावश्यक ठरते.
Web Summary : America leads global oil production, followed by Saudi Arabia and Russia. India ranks 21st, highlighting its import reliance. Oil production significantly impacts economy and defense.
Web Summary : अमेरिका तेल उत्पादन में शीर्ष पर, सऊदी अरब और रूस पीछे। भारत 21वें स्थान पर, आयात पर निर्भरता दर्शाता है। तेल उत्पादन अर्थव्यवस्था और रक्षा को प्रभावित करता है।