लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : इस्रायल-इराण युद्धाची व्याप्ती वाढल्याने कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे निर्माण झालेली जागतिक अनिश्चितता आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर विक्रीचा सपाटा लावला. परिणामी, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १०९७ अंकांनी कोसळून ७८,९१९ वर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ ३१५ अंकांनी घसरून २४,४५० वर स्थिरावला आहे.
शेअर बाजारात गुरुवारी तेजी आली होती. मात्र शुक्रवारी ही तेजी बाजार सुरू होताच ओसरली. युद्धाच्या सातव्या दिवशी तणाव वाढल्याने कच्च्या तेलाचे दर ७ टक्क्यांनी वधारून ९२ डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचले आहेत. भारतासाठी कच्चे तेल महागणे म्हणजे महागाई वाढण्याचे संकेत असल्याने बाजारात भीतीचे वातावरण पसरले. यामुळे बाजार ४५ मिनिटांत ६०० अंकांनी कोसळला.
कच्चे तेल आणखी महाग, चिंता वाढलीशुक्रवारी कच्च्या तेलाच्या दरात ७ टक्क्यांची मोठी वाढ होत ते ९२ डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचले आहेत. अमेरिकेन क्रूडच्या दरातही १० टक्क्यांची वाढ झाली.इंडियन बास्केटचे तेल २० टक्क्यांनी वाढून ८५ डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचले आहे. तेल तसेच नैसर्गिक वायूच्या दरातही मोठी वाढ झाली आहे.
पडझडीची ५ मुख्य कारणे युद्धात अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.पुरवठा साखळी विस्कळीत होण्याच्या भीतीने तेलाच्या किमतीत मोठी वाढ.विदेशी गुंतवणूकदारांकडून ३,७५२ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री.एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि एसबीआयसारख्या बड्या बँकांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण.अमेरिकन आणि युरोपीय बाजार घसरणीसह व्यवहार करत असल्याने नकारात्मक परिणाम.
कच्च्या तेलाचे दर जाणार १५० डॉलरवर युद्ध काही आठवडे सुरू राहिले तर जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसू शकतो आणि तेल निर्यात ठप्प होऊन कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १५० डॉलरपर्यंत जाऊ शकतात, असा इशारा कतारचे ऊर्जामंत्री साद अल-काबी यांनी दिला. गल्फमधून मोठ्या प्रमाणावर तेल, नैसर्गिक वायू तसेच पेट्रोकेमिकल्स आणि खतांसाठी लागणारे कच्चे पदार्थ निर्यात केले जातात. या पुरवठ्यात अडथळे आले तर अनेक उद्योगांना उत्पादन थांबवावे लागू शकते, असे ते म्हणाले.
४० डॉलर प्रति एमएमबीटीयूपर्यंत गॅस दरात वाढ होण्याची शक्यता आहे. युद्धापूर्वीच्या तुलनेत हे जवळपास चारपट अधिक असतील.
Web Summary : Escalating Israel-Iran tensions sent oil prices soaring to $92/barrel, triggering a massive sell-off. Sensex plunged 1097 points, Nifty fell 315. War-related supply chain disruptions and foreign investor selling exacerbated market decline. Experts warn oil could hit $150 if conflict persists.
Web Summary : इजरायल-ईरान तनाव बढ़ने से तेल की कीमतें 92 डॉलर प्रति बैरल तक पहुंच गईं, जिससे भारी बिकवाली हुई। सेंसेक्स 1097 अंक गिरा, निफ्टी 315 अंक नीचे। युद्ध से संबंधित आपूर्ति श्रृंखला व्यवधान और विदेशी निवेशकों की बिकवाली ने बाजार में गिरावट को और बढ़ा दिया। विशेषज्ञों का कहना है कि संघर्ष जारी रहने पर तेल 150 डॉलर तक पहुंच सकता है।