AI Impact Summit : सध्या जगभरात 'AI Impact Summit 2026' ची जोरदार चर्चा सुरू असून, उद्या २१ फेब्रुवारी रोजी या परिषदेची सांगता होत आहे. या समिटमध्ये जगातील दिग्गज अब्जाधीशांनी एआय क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. मात्र, या एआय क्रांतीच्या केंद्रस्थानी असलेल्या 'एआय चिप्स'च्या किमती ऐकून तुमचे डोळे विस्फारतील. जगातील सर्वात मोठी कंपनी एनव्हिडीयाच्या एका चिपची किंमत चक्क एका आलिशान घराइतकी आहे.
जगातील सर्वात महागडी 'ब्लॅकवेल' चिपएआय चिप्सच्या बाजारपेठेत वर्चस्व गाजवणाऱ्या एनव्हिडीया कंपनीने आपले 'ब्लॅकवेल' आर्किटेक्चर आधारित चिप्स सादर केले आहेत. या चिप्सची किंमत प्रीमियम डेटा सेंटर हार्डवेअर म्हणून निश्चित करण्यात आली आहे.
किमतीचे गणित (अंदाजे):B200 GPU: एका युनिटची किंमत सुमारे २७ ते ३६ लाख रुपये आहे.GB200 सुपरचिप : ही चिप ५४ ते ६४ लाख रुपयांच्या घरात आहे. यात एक 'ग्रेस' CPU आणि दोन 'B200' GPU ची ताकद आहे.GB200 NVL72 सिस्टम : ही संपूर्ण रॅक सिस्टीम सुमारे २३ कोटी ते २७ कोटी रुपयांपर्यंत जाते.
भारतासोबत 'एआय' मैत्रीएनव्हिडीयाने भारतात आपला विस्तार करण्यासाठी देशातील दिग्गज औद्योगिक समूहांशी हातमिळवणी केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा ग्रुप, इन्फोसिस, विप्रो, एल अँड टी आणि टेक महिंद्रासोबत भागीदारी करणार आहे. या कंपन्या एआय डेटा सेंटर्स, डिजिटल ट्विन आणि जनरेटिव्ह एआय सेवांसाठी एनव्हिडीयाच्या शक्तिशाली GPU आणि प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत.
वाचा - आयटी शेअर्समध्ये मोठी विक्री, पण पीएसयू बँकांनी सावरलं; 'हे' शेअर्स आज ठरू शकतात गेमचेंजर
एआय जगाचा नवा सम्राट१९९३ मध्ये जेन्सेन हुआंग, क्रिस मॅलाचोव्स्की आणि कर्टिस प्रीम यांनी स्थापन केलेली ही अमेरिकन कंपनी आज मार्केट कॅपच्या दृष्टीने जगातील पहिल्या क्रमांकाची कंपनी बनली आहे. कॅलिफोर्नियात मुख्यालय असलेली ही कंपनी केवळ व्हिडिओ गेम्ससाठीच नाही, तर डेटा सायन्स, हाय-परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग आणि स्वयंचलित कारसाठी चिप्स विकसित करते.
Web Summary : AI chip prices soar, rivaling luxury flats. Nvidia's chips are expensive. Reliance, Tata, and others partner with Nvidia for AI data centers and services, marking significant Indian investment in AI.
Web Summary : AI चिप की कीमतें आलीशान फ्लैटों से मुकाबला कर रही हैं। Nvidia के चिप्स महंगे हैं। रिलायंस, टाटा और अन्य कंपनियां AI डेटा सेंटर और सेवाओं के लिए Nvidia के साथ साझेदारी कर रही हैं, जो AI में महत्वपूर्ण भारतीय निवेश का प्रतीक है।