Richest railway station in India: जेव्हा आपण भारतातील सर्वात व्यस्त किंवा भव्य रेल्वे स्थानकांचा विचार करतो, तेव्हा मुंबईच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) किंवा हावडा जंक्शनची नावं प्रामुख्याने समोर येतात. मात्र, कमाईच्या बाबतीत कोणतं स्थानक 'सुपरस्टार' आहे हे तुम्हाला माहीत आहे का? भारतीय रेल्वेच्या अधिकृत आकडेवारीनं सर्वांनाच चकित केलंय. देशाची राजधानी असलेले नवी दिल्ली रेल्वे स्थानक (NDLS) हे सध्या भारतातील सर्वात श्रीमंत रेल्वे स्थानक बनलंय.
३३३७ कोटी रुपयांचा विक्रमी महसूल
आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या अहवालानुसार, नवी दिल्ली रेल्वे स्थानकानं ३,३३७ कोटी रुपयांचा वार्षिक महसूल गोळा करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. विशेष म्हणजे, ही कमाई दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या हावडा जंक्शनच्या कमाईपेक्षा (१,६९२ कोटी रुपये) जवळपास दुप्पट आहे. मुंबईचं प्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकही या शर्यतीत दिल्लीच्या बरेच मागे राहिलेय.
३ दिवसांपासून शेअरला सातत्यानं लागतंय अपर सर्किट; आता ₹३१ वर आला शेअर, 'या' घोषणेचा परिणाम
गर्दी कमी असूनही जास्त कमाईचे रहस्य
आकडेवारीचा एक मनोरंजक पैलू असा आहे की, पश्चिम बंगालच्या हावडा स्थानकावर प्रवाशांची संख्या (६.१३ कोटी) दिल्लीपेक्षा (३.९३ कोटी) जास्त आहे, तरीही दिल्लीची कमाई अधिक आहे. याचं मुख्य कारण म्हणजे प्रीमियम ट्रेन्स आणि लांब पल्ल्याचे मार्ग. नवी दिल्ली स्थानकावरून राजधानी, शताब्दी आणि वंदे भारत सारख्या शेकडो प्रीमियम गाड्या धावतात, ज्यांचं भाडं आणि पार्सल महसूल इतर स्थानकांच्या तुलनेत खूप जास्त आहे.
कमाईचे इतर मोठे स्रोत
केवळ तिकीट विक्री हे दिल्लीच्या श्रीमंतीचे एकमेव कारण नाही. नवी दिल्ली रेल्वे स्थानकाला त्याच्या भौगोलिक स्थान आणि व्हीव्हीआयपी दर्जाचा मोठा फायदा मिळतो. स्थानकावरून होणारी व्यापारी पार्सल वाहतूक प्रचंड मोठी आहे. तसंच स्थानक परिसर आणि गाड्यांवरील जाहिरातींमधून कोट्यवधी रुपयांची कमाई होते. याशिवाय स्थानकावरील दुकानं, फूड कोर्ट आणि पार्किंग शुल्कातूनही रेल्वेला मोठा महसूल मिळतो.
भविष्यातील जागतिक दर्जाचे हब
सरकार आता या श्रीमंत स्थानकाला अधिक आधुनिक बनवण्याच्या तयारीत आहे. सुमारे १०,००० कोटी रुपयांच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत नवी दिल्ली स्थानकाचा विकास आंतरराष्ट्रीय विमानतळाप्रमाणे केला जातोय. यामध्ये ट्विन डोम स्ट्रक्चर, येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र गेट्स आणि लक्झरी वेटिंग लाउंज अशा सुविधा असतील.
कमाईच्या बाबतीत भारतातील टॉप-३ स्थानकं
- नवी दिल्ली ३,३३७ कोटी रुपये
- हावडा १,६९२ कोटी रुपये
- चेन्नई सेंट्रल १,२९९ कोटी रुपये
Web Summary : New Delhi Railway Station leads India in revenue, surpassing Howrah by a significant margin. Despite lower passenger numbers, premium trains and parcel services contribute to its high earnings. A redevelopment project aims to transform it into a world-class hub.
Web Summary : नई दिल्ली रेलवे स्टेशन राजस्व में भारत में सबसे आगे है, जो हावड़ा से काफी आगे है। कम यात्री संख्या के बावजूद, प्रीमियम ट्रेनें और पार्सल सेवाएं इसकी उच्च आय में योगदान करती हैं। एक पुनर्विकास परियोजना का उद्देश्य इसे विश्व स्तरीय केंद्र बनाना है।