Union Budget
Lokmat Money > बिझनेस न्यूज > खास आहे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नेसलेली साडी, कुठला आहे पॅटर्न? कुणी केली डिझाइन? जाणून घ्या 

खास आहे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नेसलेली साडी, कुठला आहे पॅटर्न? कुणी केली डिझाइन? जाणून घ्या 

Nirmala Sitharaman's Budget Day Sarees: गेल्या ७ अर्थसंकल्पाच्या दिवशी निर्मला सीतारमण यांनी नेसलेली साडी आकर्षणाचे केंद्र राहिली आहे. यावेळीही त्यांनी एक विषेश प्रकारची साडी नेसली आहे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 11:04 IST2025-02-01T11:03:19+5:302025-02-01T11:04:09+5:30

Nirmala Sitharaman's Budget Day Sarees: गेल्या ७ अर्थसंकल्पाच्या दिवशी निर्मला सीतारमण यांनी नेसलेली साडी आकर्षणाचे केंद्र राहिली आहे. यावेळीही त्यांनी एक विषेश प्रकारची साडी नेसली आहे...

nirmala sitharaman look on budget day The saree worn special madhubani painting know about Who designed it | खास आहे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नेसलेली साडी, कुठला आहे पॅटर्न? कुणी केली डिझाइन? जाणून घ्या 

खास आहे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नेसलेली साडी, कुठला आहे पॅटर्न? कुणी केली डिझाइन? जाणून घ्या 

Nirmala Sitharaman's Budget Day Sarees: आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. खरे तर, स्वतंत्र भारतातील त्या सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री ठरल्या आहेत. आज सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. तत्पूर्वी, निर्मला सीतारमण यांनी आपल्या संपूर्ण बजेट टीमसोबत औपचारिक फोटो सेशन केले. गेल्या ७ अर्थसंकल्पाच्या दिवशी निर्मला सीतारमण यांनी नेसलेली साडी आकर्षणाचे केंद्र राहिली आहे. यावेळीही त्यांनी एक विषेश प्रकारची साडी नेसली आहे. 

यावेळी निर्मला सीतारमण यांनी पारंपरिक क्रीम कलरची 'मधुबनी मोटिफ' साडी परिधान केली आहे. या साडीवर मिथिला पेंटिंग करण्यात आले आहे. ही साडी त्यांनी डार्क लाल कलरच्या ब्लाउजसह परिधानकेली आहे. याच बरोबर, अर्थमंत्र्यांनी  सोन्याच्या बांगड्या, गळ्यात चेन आणि कानातले घातलेलेही दिसत आहे.

कुणी केलीय डिझाईन? -
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची मुधबनी पेंटिंग असलेली ही साडी त्यांना सौराठ मिथिला पेंटिंग इंस्टीट्यूटमध्ये मळाली होती. ही साडी त्यांना दुलारी देवी यांनी गिफ्ट केली होती. अशी माहिती जनता दल युनायटेडचे (जदयू) कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांनी दिली आहे. महत्वाचे म्हणजे, दुलारी देवी यांना 2021 मध्ये 'पद्म श्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

अर्थमंत्री निर्मला सीतारमण सौरथ मिथिला पेंटिंग इन्स्टिट्यूटमध्ये क्रेडिट आउटरीच उपक्रमासाठी मधुबनी येते गेल्या होत्या. तेथे त्यांची भेट दुलारी देवी यांच्याशी झाली होती. यावेळी त्यांच्यात बिहारमधील मधुबनी कलेसंदर्भात चर्चाही झाली होती. तेव्हा दुलारी देवी यांनी अर्थमंत्र्यांना ही साडी भेट म्हणून दिली होती आणि अर्थसंकल्पाच्या दिवशी नेसावी, असे म्हटले होते.
 

Web Title: nirmala sitharaman look on budget day The saree worn special madhubani painting know about Who designed it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.