Join us

भारतीय बाजारानुसार गुगलने विकसित केली नवी उत्पादने - सुंदर पिचाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 05:45 IST

अमेरिका-भारत व्यापार परिषदेने भरवलेल्या ‘इंडिया आयडियाज्’ शिखर संमेलनात पिचाई यांनी हे वक्तव्य केले

वॉशिंग्टन : भारतीय बाजाराची विशालता लक्षात घेऊन गुगलने काही खास उत्पादने विकसित केली व नंतर ती उत्पादने जागतिक बाजारातही नेण्यात आली, असे प्रतिपादन गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी केले. सुंदर पिचाई हे भारतीय वंशाचे आहेत.

अमेरिका-भारत व्यापार परिषदेने भरवलेल्या ‘इंडिया आयडियाज्’ शिखर संमेलनात पिचाई यांनी हे वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की, वैयक्तिक गोपनीयतेच्या मुद्यावर भारत आणि अमेरिका एक मानक नियम बनविण्यात अग्रणी भूमिका पार पाडू शकतात. यातून खासगी माहितीच्या सुरक्षेबरोबरच मुक्त डिजिटल व्यापाराची खात्री देता येऊ शकेल. याप्रसंगी पिचाई यांना ‘वैश्विक नेतृत्व’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. पिचाई यांनी म्हटले की, सामाजिक व आर्थिक स्थिती आणि शासन प्रणाली यात सुधारणा करण्यासाठी भारताने खूप चांगले काम केले आहे. भारताने तंत्रज्ञानास आपला अविभाज्य भाग बनविले आहे. यात सहभागी होऊ शकलो याचा आम्हाला आनंद आहे.

टॅग्स :गुगलभारत