Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर करणार मालामाल! ३२ पैकी ३२ तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला, किती मिळू शकतो परतावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 15:59 IST

महत्वाचे म्हणजे, तज्ज्ञ मंडळी या कंपनीवर १००% 'बुलिश' असून, सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा शेअर २६ टक्क्यांपर्यंत वधारू शकतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

शेअर बाजारातील गुतंवणूकदारांसाठी एक महत्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मौल्यवान कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (RIL) शेअर्ससंदर्भात तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना एक सकारात्मक आणि मोठा सल्ला दिला आहे. महत्वाचे म्हणजे, ३२ पैकी ३२ अ‍ॅनालिस्ट्सनी रिलायन्सचा शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. 

महत्वाचे म्हणजे, तज्ज्ञ मंडळी या कंपनीवर १००% 'बुलिश' असून, सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा शेअर २६ टक्क्यांपर्यंत वधारू शकतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

१६११ रुपयांपर्यंत पोहोचला होता शेअर -या शेअरसंदर्भात बोलायचे झाल्यास, हा शेअर जानेवारी २०२४ मध्ये १६०८ रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. यानंतर तो २०२५ मध्ये १५८१ रुपयांवर तर याच वर्षाच्या सुरुवातीला १६११ रुपयांपर्यंत पोहोचला होता. मात्र, अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा फटका या शेअरलाही बसला. या वर्षात आतापर्यंत हा शेअर १३ टक्क्यांनी घसरला आहे. यातच, 'Tickertape' वरील माहितीनसार, १ एप्रिल रोजी रिलायन्सचा या शेअरमध्ये १.५० टक्क्यांची तेजी दिसून आली आणि हा शेअर १३६४ रुपयांवर पोहोचला.

काय म्हणतायत ब्रोकरेज फर्म्स -अनेक देशी आणि परदेशी ब्रोकरेज कंपन्यांनी या शेअरसाठी आपले टार्गेटप्राइसही वाढवले आहेत. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलने रिलायन्ससाठी १,७३० रुपयांचे टार्गेट प्राइस ठेवले आहे. त्यांनी म्हटले आहे की, रिलायन्सच्या शेअरमधील अलीकडील घसरण अधिक आहे. कच्चे तेल आणि एलएनजीच्या वाढत्या किमतींचा यावर फारसा नकारात्मक परिणाम होणार नाही.

जागतिक स्तरावर, मॉर्गन स्टेनलीने 'ओवरवेट' रेटिंग कायम ठेवले असून १,८४७ रुपयांचे टारगेट प्राइस दिले आहे. याशिवाय, गोल्डमन सॅक्सनेही  'BUY' रेटिंगसह १,८३५ रुपयांची नवी टार्गेट प्राइस ठेवली आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Reliance Share: Experts Predict Gains; Is it Time to Buy?

Web Summary : Experts recommend buying Reliance shares, predicting up to 26% gains. Despite recent dips due to geopolitical tensions, brokerage firms maintain positive ratings and target prices, suggesting a strong potential rebound for investors.
टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्सशेअर बाजारगुंतवणूक