Blue Smart Investment: इलेक्ट्रिक राइड-हेलिंग स्टार्टअप ब्लूस्मार्टच्या सह-संस्थापकावर निधीचा अपहार केल्याचा आरोप झाल्यानंतर ही कंपनी आता बंद होण्याच्या मार्गावर आहे आणि सेबीच्या चौकशीच्या कक्षेत आहे. कंपनीने दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि इतर ठिकाणी आपली कॅब सेवा तात्पुरती बंद केली असून कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे.
ही कंपनी एकेकाळी ऑल इलेक्ट्रिक फ्लीट आणि ग्रीन बिझनेस मॉडेलसाठी प्रसिद्ध होती. त्यामुळेच बड्या दिग्गजांनी त्यात पैसे गुंतवले. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) पासून बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण, बजाज कॅपिटलचे संजीव बजाज आणि शार्क टँक इंडियाचे शार्क अशनीर ग्रोव्हर यांनीही यात गुंतवणूक केली होती.
चीन सोबत डील, पॉलिसीमध्ये बदल; ट्रम्प यांनी हार मानली का? अचानक का बदलले त्यांचे सूर
कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर?
जेनसोल इंजिनीअरिंग कंपनीचे प्रवर्तक असलेल्या या कंपनीचे सहसंस्थापक अनमोल सिंग जग्गी आणि त्यांचे भाऊ पुनीत सिंग जग्गी यांनी जेनसोल कंपनीच्या नावानं घेतलेल्या कर्जाच्या पैशांचा गैरवापर करून फ्लॅट, गोल्फ किट, ट्रॅव्हल अशा लक्झरी वस्तूंवर २६२ कोटींहून अधिक खर्च केल्याचा आरोप आहे. ज्याचा हिशोब सेबीच्या तपासातही लागला नाही. अशा परिस्थितीत सेबीनं आपल्या प्रवर्तकांना कोणत्याही कंपनीचं व्यवस्थापन करण्यास मनाई केली आणि शेअर बाजारातील प्रवेशावरही बंदी घातली.
यांची मोठी गुंतवणूक
यामुळे ब्लूस्मार्टचं कामकाजही धोक्यात आलं असून गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. ब्लूस्मार्टनं सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना मोठ्या संख्येनं आकर्षित केले होते. २०१९ मध्ये, दीपिका पादुकोणच्या फॅमिली ऑफिसनं बजाज, जितो एंजल नेटवर्क आणि रजत गुप्ता यांच्यासोबत ३ मिलियन डॉलर्सच्या एंजल फंडिंग राउंडमध्ये भाग घेतला. एनडीटीव्ही प्रॉफिटच्या रिपोर्टनुसार, धोनी आणि दीपिका पादुकोणच्या फॅमिली ऑफिसेसनं ब्लूस्मार्टच्या आर्थिक वाढीस चालना देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, ज्यात जुलै २०२४ मध्ये मोठ्या गुंतवणूक फेरीचा समावेश आहे.
धोनीची किती गुंतवणूक?
कंपनीनं २०२४ मध्ये प्री-सीरिज बी राऊंडमध्ये २४ मिलियन डॉलर्स गोळा केले, ज्यात धोनीचं फॅमिली ऑफिस, रिन्यू पॉवरचे सीईओ सुमंत सिन्हा आणि स्विस असेट मॅनेजर रिस्पॉन्सिबिलिटी इन्व्हेस्टमेंट्सच्या गुंतवणुकीचा समावेश आहे. यादरम्यान २०० कोटी रुपये जमा करण्यात आले आणि त्यात स्वीस इम्पॅक्ट इव्हेस्टर रिस्पॉन्सिबिलिटी आणि रिन्यूचे चेअरमन सुमंत सिन्हा यांचीही भागीदारी होती.
काय म्हटलं अशनीर ग्रोव्हरनं?
दरम्यान, अशनीर ग्रोव्हर यांनी यासंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर प्रतिक्रिया दिली आहे. वैयक्तिकरित्या ब्लूस्मार्टमध्ये १.५ कोटी रुपये, मॅट्रिक्समध्ये २५ लाखांची गुंतवणूक केली असल्यायची माहिती त्यांनी दिली.