ब्रिटनमधील ग्विनेड येथे एका घराची साफसफाई आणि मूल्यांकन (प्रॉबेट) सुरू असताना एक जुनं नाणं सापडलं असून त्याची तब्बल १,३७,५०,००० रुपयांना म्हणजेच १,१०,००० पौंड्सना लिलावात विक्री झाली आहे. ‘ऊना अँड द लायन’ (Una and the Lion) असं नाव असलेलं हे पाच पाउंडचं नाणं असून, ब्रिटनमध्ये आतापर्यंत पाडलेले हे ‘सर्वात सुंदर नाणं’ मानलं जातं. सोन्याचं हे नाणं कधीही सर्वसामान्यांच्या वापरासाठी चलनात आलं नव्हते. १८३९ मध्ये राणी व्हिक्टोरिया यांच्या शासनकाळाच्या सुरुवातीच्या सन्मानार्थ हे नाणं तयार करण्यात आलं होतं. अशा प्रकारची फक्त ३०० नाणीच तयार करण्यात आली होती, हेच या नाण्याच्या अफाट किमतीचं मुख्य कारण आहे.
कलाकुसर आणि ऐतिहासिक महत्त्व
या नाण्याची जगभरात चर्चा आहे. १९ व्या शतकातील महान कलाकार विल्यम वायन यांनी हे नाणं डिझाइन केलं होतं. ब्रिटिश इतिहासामध्ये पहिल्यांदाच एखाद्या शासकाला नाण्यावर एका काल्पनिक पात्राच्या रूपात दर्शवण्यात आलं होतं. या नाण्यावर राणी व्हिक्टोरिया यांना एडमंड स्पेन्सर यांच्या ‘द फेअरी क्वीन’ या प्रसिद्ध कवितेतील ‘लेडी ऊना’ या पात्राच्या रूपात कोरलं गेलंय. यामध्ये राणी एका महाकाय सिंहासोबत दिसत आहेत.
UPI अॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
का आहे हे नाणं इतकं खास?
बीबीसीच्या वृत्तानुसार, ‘ऊना अँड द लायन’ या नाण्याचा लिलाव 'रोजर्स जोन्स अँड कंपनी'नं केला. या लिलावात जगभरातील श्रीमंत खरेदीदारांनी सहभाग घेतला होता. लिलावकर्ते चार्ल्स हॅम्पशायर यांच्या मते, साहित्य, कला आणि शाही इतिहास यांचा असा संगम क्वचितच पाहायला मिळतो.
तज्ज्ञांच्या मते, हे नाणं इतकं जुनं असूनही त्याची चमक अजूनही कायम आहे. ऊना अँड द लायन नाण्याच्या विक्रीचा आतापर्यंतचा उच्चांकी विक्रम ३,४०,००० पौंड्स इतका आहे. दुर्मिळता, उत्कृष्ट कलाकुसर आणि सांस्कृतिक महत्त्वामुळे हे जगातील सर्वात मौल्यवान नाण्यांपैकी एक ठरलंय.
Web Summary : A rare 'Una and the Lion' gold coin, minted in 1839, was discovered during a house clearance in the UK and sold for ₹1.37 crore. Only 300 were made, featuring Queen Victoria as Lady Una. It's prized for its beauty and historical significance.
Web Summary : ब्रिटेन में एक घर की सफाई के दौरान 1839 में बना दुर्लभ 'ऊना एंड द लायन' सोने का सिक्का मिला, जो ₹1.37 करोड़ में बिका। महारानी विक्टोरिया को लेडी ऊना के रूप में दर्शाते हुए केवल 300 सिक्के बनाए गए थे। यह अपनी सुंदरता और ऐतिहासिक महत्व के लिए बेशकीमती है।