Join us

सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 14:14 IST

Microsoft Study: मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की एआयमुळे ज्या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे त्यात अनुवादक, लेखक आणि इतिहासकार यांचा समावेश आहे.

Microsoft Study : कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या जीवनाचा भाग बनत असताना, आता मायक्रोसॉफ्टच्या एका अभ्यासातून एक धक्कादायक सत्य समोर आले आहे. एआयमुळे केवळ दुभाषी आणि अनुवादकांच्याच नव्हे, तर इतर अनेक नोकऱ्यांवरही गंभीर परिणाम होणार आहे. यात इतिहासकार, विक्री प्रतिनिधी आणि अगदी प्रवासी परिचारिका यांसारख्या नोकऱ्यांचा समावेश आहे.

AI शी स्पर्धा नको, त्याला सोबत घ्या!सध्या, एआय म्हटलं की लोकांना वाटतं की त्यामुळे आयटी, कन्सल्टन्सी, संशोधन आणि लेखन क्षेत्रातील नोकऱ्या संपतील. पण मायक्रोसॉफ्टच्या या संशोधनाने एक वेगळंच चित्र दाखवलं आहे. मायक्रोसॉफ्ट म्हणतं की, ज्या उद्योगांवर एआयचा जास्त परिणाम होणार आहे, त्यांनी एआयशी लढण्याऐवजी, त्याला 'सह-पायलट' म्हणून कसे वापरायचे हे शिकले पाहिजे. म्हणजे, कामात एआयची मदत घेऊन काम अधिक प्रभावीपणे करावं.

AI मुळे सर्वाधिक प्रभावित होणाऱ्या नोकऱ्याया अभ्यासानुसार, एआयमुळे सर्वाधिक प्रभावित होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये ग्राहक प्रतिनिधी सर्वात वर आहेत, कारण ते सुमारे २.८६ दशलक्ष लोकांशी जोडलेले आहेत. याशिवाय, लेखक, पत्रकार, संपादक, अनुवादक आणि प्रूफरीडर यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. वेब डेव्हलपर्स, डेटा सायंटिस्ट, पीआर प्रोफेशनल्स, बिझनेस अॅनालिस्ट्स यांसारख्या क्षेत्रांमध्येही नोकरीच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, कारण चॅटजीपीटी आणि कोपायलट सारखी एआय टूल्स या नोकऱ्यांमध्ये आधीच वापरली जात आहेत.

या नोकऱ्यांवर एआयचा सर्वाधिक परिणाम होईल

  • दुभाषी आणि अनुवादक
  • इतिहासकार, समाजशास्त्रज्ञ, राजकीय शास्त्रज्ञ
  • जनसंपर्क तज्ञ, संपादक, रिपोर्टर आणि पत्रकार
  • लेखक आणि तांत्रिक लेखक
  • क्रेडिट सल्लागार, कर तयार करणारे
  • पॅरालीगल आणि कायदेशीर सहाय्यक
  • मार्केट रिसर्च विश्लेषक, व्यवस्थापन विश्लेषक
  • मानव संसाधन (HR) विशेषज्ञ
  • ग्राहक सेवा आणि विक्री प्रतिनिधी
  • विमा अंडररायटर, कर्ज अधिकारी, वित्तीय परीक्षक
  • डेटा सायंटिस्ट, डेटाबेस आर्किटेक्ट
  • ट्रॅव्हल एजंट

एआयमुळे कमी प्रभावित होणाऱ्या नोकऱ्याचांगली बातमी अशी की, काही नोकऱ्यांवर एआयचा फारसा परिणाम होणार नाही. या नोकऱ्यांमध्ये जास्त शारीरिक काम किंवा विशिष्ट कौशल्यांची गरज असते जिथे एआय लगेच जागा घेऊ शकत नाही.

  • पंप ऑपरेटर, अग्निशमन पर्यवेक्षक, जलशुद्धीकरण संयंत्र चालक
  • बांधकाम कामगार, गवंडी, लाकूडतोड उपकरणे ऑपरेटर
  • खाण कामगार, सेप्टिक टँक सर्व्हिसर, धोकादायक कचरा काढणारे कामगार
  • टायर बिल्डर्स, कुंपण बांधणारे, वेल्डर
  • फ्लेबोटोमिस्ट (रक्त नमुना गोळा करणारे), मालिश थेरपिस्ट
  • फिजिओथेरपिस्ट सहाय्यक, बांधकाम पर्यवेक्षक
  • उत्खनन यंत्र चालक, ड्रिलिंग मशीन ऑपरेटर
  • डिशवॉशर, जॅनिटर आणि क्लीनर (सफाई कामगार)
  • नोकर आणि घरकाम करणारे क्लीनर

वाचा - खाजगी बँकेचा UPI ला धक्का? आता प्रत्येक व्यवहारावर लागणार शुल्क, 'या' तारखेपासून नवा नियम लागू!

एआय मानवाची जागा घेत नाही, कामाची पद्धत बदलत आहे!मायक्रोसॉफ्टच्या या अभ्यासाचा एकंदरीत निष्कर्ष असा आहे की, एआय मानवाची जागा घेत नाहीये, तर ते फक्त काम करण्याची पद्धत बदलत आहे. एआय आपल्याला कामाच्या दरम्यान मदत करू शकते. त्यामुळे, येणाऱ्या बदलांशी जुळवून घेण्याची आणि एआयबद्दलची आपली समज वाढवण्याची गरज आहे. एआय सर्वकाही कॉपी करू शकत नाही, कारण अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांसाठी सखोल विचार आणि टीकात्मक विचारसरणी आवश्यक असते, जे एआय करू शकत नाही. त्यामुळे घाबरण्याऐवजी, एआयसोबत काम करायला शिकणे अधिक महत्त्वाचे आहे.

टॅग्स :आर्टिफिशिअल इंटेलिजन्सनोकरीकर्मचारीमाहिती तंत्रज्ञान