Union Budget
Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेतकरी, महिला आणि ग्रामीण विकासावर 'अर्थ'पूर्ण भर! फडणवीसांकडून बळीराजासाठी ५ मोठ्या घोषणा

शेतकरी, महिला आणि ग्रामीण विकासावर 'अर्थ'पूर्ण भर! फडणवीसांकडून बळीराजासाठी ५ मोठ्या घोषणा

Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात राज्याचा २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 14:31 IST2026-03-06T14:30:06+5:302026-03-06T14:31:17+5:30

Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात राज्याचा २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.

Maharashtra Budget 2026 Major Announcements for Farmers, AI Integration, and Rural Welfare | शेतकरी, महिला आणि ग्रामीण विकासावर 'अर्थ'पूर्ण भर! फडणवीसांकडून बळीराजासाठी ५ मोठ्या घोषणा

शेतकरी, महिला आणि ग्रामीण विकासावर 'अर्थ'पूर्ण भर! फडणवीसांकडून बळीराजासाठी ५ मोठ्या घोषणा

Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात राज्याचा २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. राज्याची अर्थव्यवस्था सध्या देशातील सर्वात गतिशील अर्थव्यवस्थांपैकी एक असून ती ७.९ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात वर्तवण्यात आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी 'स्मार्ट' शेती आणि सर्वसमावेशक विकासावर भर देत शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणांचा पाऊस पाडला.

शेतकऱ्यांसाठी 'स्मार्ट' घोषणांचा वर्षाव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणावर विशेष लक्ष केंद्रित केले.

  1. महाविस्तार एआय : ३० लाख शेतकऱ्यांना 'महाविस्तार' या एआय तंत्रज्ञानाद्वारे शेतीविषयक सर्व तांत्रिक आणि बाजारपेठेतील माहिती त्वरित उपलब्ध करून दिली जाईल.
  2. वसुधा मेसेज सेवा : ज्या शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाहीत, त्यांच्यासाठी 'वसुधा' ही विशेष मेसेज सेवा सुरू करण्यात येणार आहे. याद्वारे सरकारी योजनांची माहिती थेट त्यांच्या फोनवर मिळेल.
  3. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना: या योजनेत आता शेतमजुरांचाही समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
  4. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योग योजना: ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ही नवीन योजना सुरू केली जाणार आहे.
  5. महिला शेतकरी सक्षमीकरण: महिला शेतकऱ्यांच्या उद्योजकतेसाठी विशेष कार्यक्रम राबवून त्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.
  6. डिजिटल सेवा विस्तार: शासनाच्या सर्व योजना डिजिटल माध्यमांतून थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत.

२०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था!

राज्याच्या आर्थिक प्रगतीबद्दल विश्वास व्यक्त करताना फडणवीस म्हणाले की, पायाभूत सुविधांमधील मोठी गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभतेमुळे महाराष्ट्राची स्पर्धात्मकता वाढली आहे. "आपण २०४७ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच, २०३५ मध्ये राज्याचा अमृत महोत्सव साजरा करताना त्यासाठी काही विशेष उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत," असेही त्यांनी स्पष्ट केले.

वाचा - मुंबई, दुबई, सिंगापूरमध्ये पर्यटन गुंतवणूक कक्ष सुरू करणार; ५० पर्यटनस्थळांवर अत्याधुनिक सुविधा - अर्थमंत्री

स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी
शहरी आणि ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक सक्षम आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी विशेष तरतूद केली जाणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. कृषी, उद्योग आणि सेवा या तिन्ही क्षेत्रांत संतुलित वाढ राखल्यानेच राज्याला ७.९ टक्क्यांचा विकास दर गाठणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 

Web Title : महाराष्ट्र बजट: किसान, महिला, ग्रामीण विकास पर ज़ोर।

Web Summary : महाराष्ट्र के बजट में किसानों के लिए एआई, एसएमएस सेवा, खेत मजदूरों के लिए दुर्घटना बीमा, पशुधन योजनाएं, महिला सशक्तिकरण कार्यक्रम और डिजिटल सेवाएं शामिल हैं। राज्य का लक्ष्य 2047 तक 5 ट्रिलियन डॉलर की अर्थव्यवस्था बनना है।

Web Title : Maharashtra Budget focuses on farmers, women, and rural development initiatives.

Web Summary : Maharashtra's budget prioritizes farmers with AI, SMS services, accident insurance inclusion for farm laborers, livestock schemes, women empowerment programs, and digital services. The state aims for a $5 trillion economy by 2047, strengthening local bodies with balanced growth.