Join us
Daily Top 2Weekly Top 5

LPG टंचाईचा फटका; पुण्यात आणि मुंबईत दरांचा मोठा फरक; वाचा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 10:42 IST

LPG Price : देशभरात एलपीजीचा तुटवडा कायम असून, विविध शहरांमधील घरगुती सिलिंडरचे नवीन दर जाहीर झाले आहेत.

LPG Price : मध्य-पूर्वेतील 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' बंद झाल्यामुळे उद्भवलेल्या जागतिक एलपीजी टंचाईचा परिणाम आता भारतीय स्वयंपाकघरांवर आणि हॉटेल व्यवसायावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक शहरांमध्ये घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ झाली असून, हॉटेल आणि ढाब्यांनी खाद्यपदार्थांचे दर वाढवले आहेत. या संकटावर मात करण्यासाठी आता सरकार 'इलेक्ट्रिक कुकिंग'ला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत आहे.

प्रमुख शहरांतील घरगुती सिलेंडरचे दरदेशातील विविध शहरांमध्ये एलपीजी सिलेंडरचे दर गगनाला भिडले आहेत. महाराष्ट्रात पुणे आणि मुंबईत दरांमध्ये मोठी तफावत पाहायला मिळत आहे:

शहर घरगुती सिलेंडर दर (₹)
पुणे ९६०.०० 
मुंबई ९१२.५० 
श्रीनगर १०२९.०० 
दरभंगा १०१०.०० 
पाटणा १००२.५० 
रायपूर ९८४.०० 
वाराणसी ९७६.५० 
लखनऊ ९५०.५० 
दिल्ली ९१३.०० 
अहमदाबाद ९२०.०० 

टीप: हॉर्मुझच्या संकटामुळे पुरवठा विस्कळीत झाल्याने स्थानिक पातळीवर दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत.)

इलेक्ट्रिक शेगडी' ठरणार पर्यायी लाइफलाईन!एलपीजीची कमतरता भरून काढण्यासाठी केंद्र सरकारची संस्था 'एनर्जी एफिशिएंसी सर्व्हिसेस लि.' वेगाने पावले उचलत आहे. ईईएसएल दोन टप्प्यांत तब्बल ५ लाख इलेक्ट्रिक चुली (इंडक्शन) खरेदी करण्यासाठी नवीन निविदा जाहीर करणार आहे. बाजारात सध्या इंडक्शन शेगड्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. ही दरवाढ रोखण्यासाठी आणि सर्वसामान्यांना स्वस्त दरात शेगड्या उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने 'राष्ट्रीय कुशल स्वयंपाक कार्यक्रम' हाती घेतला आहे. केवळ शेगड्याच नव्हे, तर इंडक्शनवर चालणाऱ्या खास भांड्यांसाठीही ईईएसएलने निविदा काढल्या आहेत, जेणेकरून ग्राहकांना पूर्ण 'कुकिंग सेट' मिळू शकेल.

वाचा - सरकारी पंपावर स्वस्त, मग 'नायरा'कडे महाग का? खाजगी तेल कंपन्यांच्या दरवाढीची इनसाईड स्टोरी

हॉटेल व्यवसायाला फटकागॅसच्या तुटवड्यामुळे आणि वाढत्या दरामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि छोट्या ढाब्यांनी आपल्या 'मेनू कार्ड'मध्ये बदल केला आहे. इंधनाचा खर्च वाढल्याने बाहेरचे जेवण महाग झाले असून, काही ठिकाणी हॉटेल मालक आता व्यावसायिक गॅस ऐवजी इलेक्ट्रिक कमर्शियल कुकिंगचा वापर करण्यावर भर देत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : LPG Shortage Bites: Pune, Mumbai Prices Differ; Check Latest Rates

Web Summary : LPG shortage impacts Indian kitchens, raising cylinder prices. Pune and Mumbai show price differences. Government promotes electric cooking to mitigate crisis, offering subsidized induction cooktops.
टॅग्स :एलपीजी गॅस टंचाईइंधन टंचाईइंधन दरवाढअमेरिका-इस्रायल-इराण वॉर