LPG Price Today in Pakistan: इराण-इस्रायल युद्धाच्या झळा जवळजवळ सर्वच देशांना बसत आहेत. जगभरात पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किमती वाढत असताना, भारतामध्ये एलपीजीच्या घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांना सध्या दिलासा आहे. याउलट, पाकिस्तानात एलपीजीच्या किमती सर्वसामान्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत. सरकारी दर आणि बाजारातील प्रत्यक्ष किमती यांमधील मोठ्या फरकामुळे ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त बोजा पडत आहे.
पाकिस्तानातील एलपीजीचे दर
पाकिस्तानातील सरकारी नियामक संस्था 'ऑईल अँड गॅस रेग्युलेटरी अथॉरिटी' (OGRA) नुसार, एलपीजीची किंमत २२५.८४ पाकिस्तानी रुपये प्रति किलो आहे. त्यानुसार ११.८ किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत २,६६४ पाकिस्तानी रुपये आहे. मात्र, lpgpriceinpakistan.com नुसार बाजारातील स्थिती वेगळी आहे. किरकोळ बाजारात एलपीजी ३०० ते ४०० पाकिस्तानी रुपये प्रति किलोनं मिळत आहे. तर घरगुती सिलिंडर ३,५०० ते ४,५५० पाकिस्तानी रुपये आणि व्यावसायिक सिलिंडर १३,६०० ते १७,००० पाकिस्तानी रुपये (सरकारी दर १०,२५३ रुपये असताना) इतका झालाय.
भारतातील एलपीजीचे दर
नवी दिल्ली: घरगुती ₹९१३ | व्यावसायिक ₹१,८८४.५०चेन्नई: घरगुती ₹९२८.५० | व्यावसायिक ₹२,०४३.५०हैदराबाद: घरगुती ₹९६५ | व्यावसायिक ₹२,१०५.५०मुंबई: घरगुती ₹९१२.५० | व्यावसायिक ₹१,८३६
भारत विरुद्ध पाकिस्तान: कुठे स्वस्त?
भारतीय मानकानुसार १४.२ किलो सिलिंडरचा विचार केल्यास, पाकिस्तानात त्याची किंमत ४,२६० ते ५,६८० पाकिस्तानी रुपये होते. सध्याच्या विनिमय दरानुसार (१ पाकिस्तानी रुपया = ₹०.३०) ही किंमत भारतीय चलनानुसार सुमारे ₹१,२७८ ते ₹१,७०४ पडते. भारतात हाच सिलिंडर ₹९०० ते ₹९५० च्या दरम्यान उपलब्ध आहे. या तुलनेवरून स्पष्ट होते की, पाकिस्तानात एलपीजी भारताच्या तुलनेत ३०% ते ८०% महाग आहे. आयातीवर अति-अवलंबित्व, कमकुवत चलन आणि पुरवठा साखळीतील अडथळे ही पाकिस्तानातील दरवाढीची प्रमुख कारणं आहेत.
Web Summary : Pakistan faces soaring LPG prices due to geopolitical tensions and economic instability. Domestic cylinders cost up to ₹4500, while commercial ones hit ₹17000. In contrast, Indian LPG prices remain stable, significantly cheaper than Pakistan's due to import dependence and currency issues.
Web Summary : भू-राजनीतिक तनाव और आर्थिक अस्थिरता के कारण पाकिस्तान में एलपीजी की कीमतें आसमान छू रही हैं। घरेलू सिलेंडर की कीमत ₹4500 तक, जबकि वाणिज्यिक सिलेंडर की कीमत ₹17000 तक पहुंच गई है। इसके विपरीत, भारत में एलपीजी की कीमतें स्थिर हैं और आयात निर्भरता और मुद्रा मुद्दों के कारण पाकिस्तान की तुलना में काफी सस्ती हैं।