Join us
Daily Top 2Weekly Top 5

एका झटक्यात Reliance ला 68093 कोटींचे नुकसान; शेअर गडगडला, जाणून घ्या कारण

By हेमंत बावकर | Updated: November 2, 2020 13:54 IST

Reliance Industries : देशातील सर्वाधिक बाजारमुल्य असेलेली कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने दुसऱ्या तिमाहीतील निकाल घोषित केले आहेत. कंपनीला सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये एकूण 9567 कोटींचा फायदा झाला आहे.

देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) च्या शेअर्समध्ये सोमवारी मोठी घसरण झाली. तब्बल ६ टक्क्यांनी शेअर पडले. सप्टेंबर तिमाहीत नफा घटल्याने शेअरवर त्याचा परिणाम जाणवला. शुक्रवारी उशिरा कंपनीने तिमाहीचे आकडे स्टॉक एक्स्चेंजला दिले होते. यामुळे सोमवारी बाजार उघडताच रिलायन्सचे शेअर धडाधड कोसळायला सुरुवात झाली. 

बीएसईवर कंपनीचा शेअर  5.54 टक्क्यांनी घटून 1940.50 रुपयांवर आला होता. तर एनएसईवरदेखील 5.57 टक्के शेअर पडून 1940.05 वर आला होता. या पडझडीमुळे कंपनीटे बाजारमुल्य एका झटक्यात 68093.52कोटींनी कमी झाले. ते सध्या 13,21,302.15 कोटी रुपये झाले आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 15 टक्क्यांची घट नोंदविली गेली. 

धूम धूम! जगभरात Reliance Jio ची बूम; 40 कोटी ग्राहकांसोबत बनली नंबर 1

देशातील सर्वाधिक बाजारमुल्य असेलेली कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने दुसऱ्या तिमाहीतील निकाल घोषित केले आहेत. कंपनीला सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये एकूण 9567 कोटींचा फायदा झाला आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत हा फायदा 15 टक्क्यांनी तुटला आहे. गेल्या वर्षी दुसऱ्या तिमाहीत 11262 कोटींचा फायदा झाला होता. महत्वाचे म्हणजे कोरोना काळात रिलायन्सला परदेशातून करोडो रुपयांची गुंतवणूक मिळाली आहे. 

देशभरात कोरोना संकटामुळे लॉकडाऊन असूनही कंपनीला जूनच्या तिमाहीत 8380 कोटींचा नफा झाला होता. वार्षिक आकडेवारीनुसार कंपनीला शुद्ध नफ्यामध्ये 15 टक्क्यांची घट सहन करावी लागली आहे. कंपनीचे उत्पन्ना 2020-20 च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये घटून 1.2 लाख कोटी रुपये झाले. जे वर्षभरापूर्वी 2019-20 मध्ये याच तिमाहीत 1.56 कोटी एवढे होते. 

करोडोंची गुंतवणूक आली तरीही Reliance चा नफा घटला; जिओचा ट्रिपल धमाका

जिओ नफ्यातगेल्या चार वर्षांत देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी बनलेल्या रिलायन्स जिओचा शुद्ध नफा या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत तिपटीने वाढला आहे. जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीला लाभ 2844 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीत कंपनीला 990 कोटी रुपयांचा लाभ झाला होता. तिमाहीच्या आधारे ही वाढ 12.85 टक्के एवढी आहे. जूनच्या तिमाहीमध्ये कंपनीला 2520 कोटींचा निव्वळ नफा झाला होता. 

टॅग्स :रिलायन्सशेअर बाजार