जर तुम्ही वाहन चालवत असाल आणि टोल प्लाझावर फास्टॅगचा (FASTag) वापर करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जर तुम्ही ३१ ऑक्टोबरनंतर तुमच्या वाहनाचं नवीन नो युवर व्हेइकल (Know Your Vehicle / KYV) व्हेरिफिकेशन केले नाही, तर तुमचा FASTag आपोआप बंद होईल. म्हणजेच, तुम्हाला पुन्हा एकदा टोल रोख स्वरूपात भरावा लागेल, जो FASTag च्या तुलनेत दुप्पट असतो. सरकारनं हा निर्णय पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि गैरव्यवहार थांबवण्यासाठी घेतला असल्याचं म्हटले आहे, परंतु सामान्य लोकांना आता आणखी एका प्रक्रियेतून जावे लागणार आहे.
आतापर्यंत, अनेक लोक एकच FASTag वेगवेगळ्या गाड्यांमध्ये वापरत होते. काही लोक तर टॅग खिशात ठेवून टोल पार करत होते, ज्यामुळे सिस्टीममध्ये त्रुटी निर्माण होत होत्या. याच कारणामुळे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानं (NHAI)आता केवायव्ही (KYV) अनिवार्य केलं आहे. याचा अर्थ, प्रत्येक FASTag आता केवळ त्याच वाहनाशी जोडलेला असेल, ज्यासाठी तो जारी करण्यात आला आहे. यामुळे लहान वाहनांवर मोठ्या वाहनांसाठी असलेल्या FASTag चा वापर होणार नाही, याचीही खात्री केली जाईल.
ऑफर्समागे धावताहेत क्रेडिट कार्डधारक; ४२% लोकांची ५० हजारांची दिवाळी खरेदी
केवायव्हीची प्रक्रिया कशी आहे?
केवायव्ही करण्याची प्रक्रिया खूप सोपी ठेवण्यात आली आहे. वाहन मालकांना त्यांच्या गाडीचे नोंदणी प्रमाणपत्र (Registration Certificate - RC), ओळखपत्र (जसे की आधार, पॅन किंवा पासपोर्ट) आणि काही प्रकरणांमध्ये त्यांचा नवीन फोटो अपलोड करावा लागेल. काही वाहनांसाठी, गाडीच्या पुढील भागाचे आणि बाजूने काढलेले फोटो देखील मागवले जाऊ शकतात, ज्यामध्ये नंबर प्लेट आणि FASTag स्पष्ट दिसेल.
तुम्हाला ज्या बँकेतून FASTag जारी केला आहे, त्या बँकेच्या वेबसाइट किंवा ॲपद्वारे देखील हे व्हेरिफिकेशन करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त Know Your Vehicle किंवा Update KYV पर्यायावर क्लिक करावा लागेल, आवश्यक कागदपत्रं अपलोड करावी लागतील आणि ओटीपी (OTP) व्हेरिफिकेशन पूर्ण करावं लागेल. एकदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, तुमचा टॅग Active and Verified असा दिसेल.
जर प्रक्रिया पूर्ण केली नाही तर...
जर कोणत्याही वाहन मालकाने केवायव्ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर FASTag मध्ये शिल्लक असली तरीही तो आपोआप निष्क्रिय होईल. अपूर्ण व्हेरिफिकेशनमुळे टोल प्लाझावर गाड्या थांबवल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी अलीकडे आल्या आहेत.
सरकारचे मत आणि लोकांचा दृष्टिकोन
सरकारचं म्हणणं आहे की, दीर्घकाळात केवायव्ही सिस्टीम अधिक नीट आणि सुव्यवस्थित करेल. यामुळे चोरी झालेल्या किंवा विकल्या गेलेल्या वाहनांचा मागोवा घेणे सोपे होईल. चुकीच्या पद्धतीनं होणारी टोल वसुली कमी होईल आणि संपूर्ण डिजिटल टोल सिस्टीममध्ये पारदर्शकता वाढेल. जोपर्यंत वाहनाची मालकी बदलत नाही, तोपर्यंत हे व्हेरिफिकेशन वैध राहील. जर गाडी विकली गेली किंवा नवीन नोंदणी क्रमांक जारी झाला, तर केवायव्ही प्रक्रिया पुन्हा करावी लागेल.
अनेक लोकांचं मत आहे की ही प्रक्रिया म्हणजे बँकांमध्ये केवायसी (KYC) करण्यासारखाच आणखी एक अडथळा आहे. पण सत्य हे आहे की, जर तुम्ही केवायव्ही केलं नाही, तर तुम्हाला टोल टॅक्स रोख स्वरूपात भरावा लागेल. त्यामुळे प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून, वेळेत हे व्हेरिफिकेशन पूर्ण करणं अधिक चांगलं आहे.
Web Summary : FASTag users must complete Know Your Vehicle (KYV) verification by October 31st or face deactivation and double tolls. This initiative by NHAI aims to curb misuse, link FASTags to specific vehicles, and enhance transparency in toll collection. Complete KYV via your bank's website or app.
Web Summary : FASTag उपयोगकर्ताओं को 31 अक्टूबर तक 'नो योर व्हीकल' (KYV) सत्यापन पूरा करना होगा, अन्यथा FASTag निष्क्रिय हो जाएगा और दोगुना टोल देना पड़ सकता है। NHAI का लक्ष्य दुरुपयोग को रोकना, FASTag को विशिष्ट वाहनों से जोड़ना और टोल संग्रह में पारदर्शिता बढ़ाना है। बैंक की वेबसाइट या ऐप के माध्यम से KYV पूरा करें।