Join us

उद्योजक गार्दीकडून ईडी समन्सला केराची टोपली; साधे उत्तरही नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 09:46 IST

५३८ कोटींचा कर्ज घोटाळा; मनी लाॅंड्रिंग झाल्याचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कॅनरा बँकेची तब्बल ५३८ कोटी रुपयांची कथित फसवणूकप्रकरणी अटकेत असलेले जेट एअरवेज कंपनीचे संस्थापक नरेश गोयल यांच्या चौकशीसंदर्भात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दुबईस्थित एका उद्योजकाला समन्स जारी केल्याचे वृत्त आहे. मात्र, हा उद्योजक अद्याप ईडीच्या चौकशीसाठी हजर झाला नसल्याची माहिती असून त्याने या समन्सला उत्तरही दिले नसल्याचे समजते. हसमुख गार्दी असे या उद्योजकाचे नाव आहे. मधल्या काळात गाजलेल्या पनामा पेपर प्रकरणातही त्याचे नाव चर्चेत आले होते.

व्यवहारांसाठी मुखत्यारपत्रगोयल यांनी कॅनरा बँकेत केलेल्या कथित आर्थिक घोटाळ्यातील पैशांचे मनी लॉड्रिंग गार्दी याने केल्याचा ईडीच्या अधिकाऱ्यांना संशय असून त्याच अनुषंगाने ईडीच्या अधिकाऱ्यांना त्याची चौकशी करायची आहे. गोयल यांच्या चौकशीतून गार्दी याचे नाव पुढे आल्याची माहिती आहे. आपल्या व्यवहारांसाठी आपण गार्दी याला मुखत्यारपत्र दिल्याचे गोयल यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे या कथित घोटाळ्याप्रकरणी गार्दी याच्याकडे आता गोयल अंगुलीनिर्देश करत असल्याचे दिसून येते. दरम्यान, गोयल व कुटुंबीयांनी कंपनीच्या तिजोरीतील पैसे व गार्दी याच्याकडून काही पैसे घेत मोठ्या प्रमाणावर आलिशान फर्निचर व दागिन्यांची खरेदी केल्याचाही आरोप तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी ठेवला आहे. तर, नरेश गोयल यांच्यासाठी काही अचल मालमत्तांची खरेदी करण्यासाठी गार्दी याने पैसे दिल्याचाही अधिकाऱ्यांना संशय आहे.

जेट एअरवेजमध्येहिस्सेदारीnगोयल यांनी स्थापन केलेल्या जेट एअरवेज कंपनीमध्ये गार्दी याची हिस्सेदारी ३४ टक्क्यांची असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे असून ताली विन्ड्स इंडिया कंपनीमध्ये तो संचालक असल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. nया कथित आर्थिक घोटाळ्यामध्ये त्याची भूमिका महत्त्वाची असल्याचा दावा करत अधिकाऱ्यांनी हे समन्स जारी केले आहे.

टॅग्स :व्यवसायअंमलबजावणी संचालनालयगुन्हेगारी