Join us

पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 10:38 IST

Upcoming IPO: बाजार नियामक सेबीनं कॅनरा रोबेको अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी आणि हीरो मोटर्ससह सहा कंपन्यांना त्यांचे आयपीओ लाँच करण्यास मान्यता दिली आहे. पाहा काय आहेत डिटेल्स आणि कोणत्या आहेत या कंपन्या.

Upcoming IPO: बाजार नियामक सेबीनं कॅनरा रोबेको अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी आणि हीरो मोटर्ससह सहा कंपन्यांना त्यांचे आयपीओ लाँच करण्यास मान्यता दिली आहे. आयपीओसाठी मान्यता मिळालेल्या कंपन्यांमध्ये पाइन लॅब्स, ऑर्कला इंडिया, मणिपाल पेमेंट अँड आयडेंटिटी सोल्युशन्स आणि एमव्ही फोटोव्होल्टेइक पॉवर यांचाही समावेश आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (सेबी) वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या अपडेटेड माहितीनुसार, या कंपन्यांनी एप्रिल ते जुलै दरम्यान आयपीओसाठी कागदपत्रे सादर केली आहेत. या कंपन्यांना २ ते १२ सप्टेंबर दरम्यान सेबीकडून आयपीओ लाँच करण्यास मान्यता मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

हीरो मोटर्स ₹१,२०० कोटींचा आयपीओ आणणार

कॅनरा रोबेको एएमसीचा ४.९८ कोटी इक्विटी शेअर्सचा आयपीओ पूर्णपणे ओएफएसद्वारे (ऑफरिंग ऑफर) असेल. प्रमोटर्स कॅनरा बँक २.५९ कोटी शेअर्स विकणार आहे आणि ओरिक्स कॉर्पोरेशन युरोप एनव्ही २.३९ कोटी शेअर्स विकतील. यातून मिळणारं उत्पन्न प्रमोटर्सकडे जाईल, कंपनीला कोणताही रोख प्रवाह राहणार नाही.

शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले

हीरो मोटर्स आयपीओद्वारे अंदाजे ₹१,२०० कोटी उभारण्याची योजना आखत आहे. यामध्ये ₹८०० कोटी किमतीचे नवीन इक्विटी शेअर्स जारी करणं आणि ओएफएसद्वारे ₹४०० कोटी किमतीच्या शेअर्सचा समावेश आहे. एमव्ही फोटोव्होल्टेइक पॉवर ₹३,००० कोटी किमतीच्या आयपीओची योजना आखत आहे, ज्यामध्ये ₹२,१४३.८६ कोटी किमतीचे शेअर्सचा नवीन इश्यू आणि ₹८५६.१४ कोटी किमतीचे ओएफएस समाविष्ट आहे.

अन्य कंपन्यांच्या आयपीओची काय स्थिती?

टेमासेक आणि पीक एक्सव्ही पार्टनर्स यांच्या पाठिंब्याने तयार झालेल्या पाइन लॅब्सच्या आयपीओमध्ये ₹२,६०० कोटींचा नवीन शेअर इश्यू आणि १४.७८ कोटी शेअर्सचा ओएफएस असेल. दरम्यान, मणिपाल पेमेंट्स अँड आयडेंटिटी सोल्युशन्सनं गोपनीयपणे सेबीकडे मसुदा कागदपत्रे दाखल केली आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार कंपनी अंदाजे ₹१,२०० कोटी उभारण्याची योजना आखत आहे. एमटीआर आणि ईस्टर्न या फूड ब्रँडचं संचालन करणारे ऑर्कला इंडिया शुद्ध ओएफएसद्वारे भांडवल उभारेल. या ऑफर अंतर्गत, प्रवर्तक आणि इतर विद्यमान भागधारक २.२८ कोटी शेअर्स विकतील. सर्व सहा कंपन्यांचे शेअर्स बीएसई आणि एनएसईवर लिस्ट केले जातील.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसाइनिशिअल पब्लिक ऑफरिंग