Join us

KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 18:03 IST

KBC Golden Week : जर तुम्ही भीम अॅप वापरणारे असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही कौन बनेगा करोडपती या शोमध्ये हॉट सीटवर जाऊ शकता.

KBC Hot Seat :टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय क्विज शो 'कौन बनेगा करोडपती' चा १७वा सीझन सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. अवघ्या ७ दिवसातच या शोला पहिला करोडपती मिळाला आहे. आता दुसरा करोडपती होण्याची संधी तुमच्यासाठी चालून आली आहे. या शोच्या हॉट सीटवर बसण्याचे स्वप्न अनेकजण पाहतात. हे स्वप्न पूर्ण करण्याची एक खास संधी उपलब्ध झाली आहे. 'भीम' (BHIM) ॲपच्या वापरकर्त्यांसाठी सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनने 'केबीसी गोल्डन वीक' सुरू केला आहे.

भीम ॲप युजर्ससाठी स्पेशल वीकया विशेष आठवड्यादरम्यान, भीम ॲपच्या निवडक १० वापरकर्त्यांना केबीसीच्या सेटवर जाण्याची आणि 'फास्टेस्ट फिंगर फर्स्ट' खेळण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धकांपैकी विजेत्याला थेट अमिताभ बच्चन यांच्यासोबत हॉट सीटवर बसून गेम खेळण्याचा बहुमान मिळेल. एका डिजिटल पेमेंट ॲपसाठी केबीसीचा एक स्पेशल वीक आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

१ सप्टेंबरपासून सुरू होणार रजिस्ट्रेशननॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या भीम पेमेंट्स ॲपने सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनसोबत ही भागीदारी केली आहे. या 'गोल्डन वीक'साठी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया १ सप्टेंबर २०२५ पासून १० ऑक्टोबर २०२५ पर्यंत सुरू राहील. भीम ॲप वापरणारे ग्राहक या कालावधीत सहजपणे नोंदणी करू शकतात. निवडलेल्या १० स्पर्धकांना खास ५ एपिसोड्सच्या स्पेशल गोल्डन वीक एपिसोडमध्ये दाखवले जाईल, जे सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होतील.

वाचा - फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन

असे करा रजिस्ट्रेशनतुम्हीही या शोमध्ये सहभागी होऊ इच्छित असाल, तर खालीलप्रमाणे सोप्या स्टेप्स फॉलो करा.

  1. सर्वप्रथम, तुमच्या फोनमध्ये BHIM Payments App डाउनलोड किंवा अपडेट करा.
  2. ॲपमध्ये दिलेल्या 'KBC Golden Week with BHIM' या विशेष सेक्शनवर जा.
  3. तिथे विचारलेल्या सोप्या प्रश्नाचे उत्तर द्या आणि तुमची मूलभूत माहिती भरून सबमिट करा.
  4. सर्व एंट्रींची तपासणी केबीसीच्या मानक निवड प्रक्रियेनुसार केली जाईल.
  5. निवडल्या गेलेल्या १० स्पर्धकांना गोल्डन वीक दरम्यान शोमध्ये येऊन 'फास्टेस्ट फिंगर फर्स्ट' खेळण्याची संधी मिळेल.
  6. 'फास्टेस्ट फिंगर फर्स्ट'चा विजेता थेट अमिताभ बच्चन यांच्यासोबत हॉट सीटवर बसून गेम खेळू शकेल.
टॅग्स :कौन बनेगा करोडपतीअमिताभ बच्चनटेलिव्हिजनपैसा