Join us  

Kalyan Jewellers IPO: कल्याण ज्वेलर्सचा IPO उघडला; गुंतवणूक करावी का? पाहा काय म्हणतात जाणकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 6:54 PM

Kalyan Jewellers IPO : २०१२ नंतर शेअर बाजारात लिस्ट होणारी ठरणार पहिली ज्वेलरी कंपनी, पाहा काय म्हणतात जाणकार

ठळक मुद्दे२०१२ नंतर शेअर बाजारात लिस्ट होणारी ठरणार पहिली ज्वेलरी कंपनीकंपनीनं १,१७५ कोटी रूपयांचा इश्यू आणला आहे.

मंगळवारी ज्वेलरीची देशातील मोठी कंपनी कल्याण ज्वेलर्सचा आयपीओ खुला झाला आहे. २०१२ या वर्षानंतर शेअर बाजारात लिस्ट होणारी ही पहिली कंपनी ठरली आहे. कल्याण ज्वेलर्सपूर्वी शेअर बाजारात पीसी ज्वेलर्स ही कंपनी लिस्ट झाली होती. कल्याण ज्वेलर्सचा आयपीओ हा १६ मार्चला उघडला असून १८ मार्चला बंद होईल. या कंपनीत वॉरबर्ग पिनकस या कंपनीनंही गुंतवणूक केली आहे. कंपनी या आयपीओद्वारे १,१७५ कोटी रूपये उभारण्याच्या तयारीत आहे. कल्याण ज्वेलर्सच्या आयपीओचा प्राईस बँड ८६-८७ रूपये निश्चित करण्यात आला आहे. कल्याण ज्वेलर्सनं यापूर्वी इश्यूद्वारे १७५० कोटी रूपये जमवण्याची तयारी केली होती. परंतु बाजाराची स्थिती पाहता त्यांनी आपला निर्णय बदलला. आता कंपनीनं १,१७५ कोटी रूपयांचा इश्यू आणला आहे. कंपनी ८०० कोटी रूपयांचा फ्रेश इश्यू जारी करणार आहे. तर ३७५ कोटी रूपयांचे शेअर ऑफर फॉर सेलमध्ये विकणार आहे. प्री-आयपीओ प्लेसमेंटसाठी कंपनी बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी चर्चा करत आहे. ऑफर फॉर सेलमध्ये कंपनीचे प्रमोटर टीएस कल्याणरमन १२५ कोटी रूपये आणि हायडेल इन्व्हेस्टमेंट २५० कोटी रूपयांचे शेअर्स विकणार आहेत. या कंपनीत कल्याणरमन यांची २७.४१ टक्के आणि हायडेल इन्व्हेस्टमेंटचा २४ टक्के हिस्सा आहे. कंपनी यातून उभारलेल्या निधीचा वापर पुढील दोन वर्षांच्या कामकाजासाठी करणार आहे. काय म्हणतात जाणकार?कल्याण ज्वेलर्स देशातील सर्वात मोठी ज्वेलरी कंपनी आहे. व्हॅल्यूएशननुसार कंपनीचा प्री इश्यू TTM EV/ सेल्स 1.4 आहे. कंपनीच्या अपर प्राईज बँडनुसार पाहिलं तर ही स्पर्धक कंपनी टायटन पेक्षा कमी आहे. टायटनचा फायनॅन्शिअल रेकॉर्ड हा कल्याण ज्वेलर्सपेक्षा उत्तम आहे, असं मिंटनं एन्जेल ब्रोकिंगच्या हवाल्यानं म्हटलं आहे. मजबूत ब्रँड आणि मोठ्या प्रमाणात असलेल्या स्टोअर्सकडे पाहता कंपनी उत्तम प्रदर्शन करेल अशी आशा आहे. यासाठी त्यांनी आयपीओ खरेदीचा सल्ला दिला आहे. तर दुसरीकडे ब्रोकरेज हाऊस जिओजित फायनॅन्शिअलनं आयपीओमध्ये सबस्क्राईब करण्याचा सल्ला दिला आहे. कंपनीचे भारतात २१ राज्यात १०७ शोरूम्स आहे. जर पश्चिम आशियात ३० शोरूम्स आहेत. कंपनीचा कस्टमर बेस मजबूत आहे आणि मॅनेजमेंट टीम ज्वेलरी आणि रिटेल इंडस्ट्रीच्याबाबतीत अनुभवी आहे. याचा फायदा कल्याण ज्वेलर्सना मिळणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. 

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगगुंतवणूकपैसासोनंचांदीशेअर बाजार