Join us
Daily Top 2Weekly Top 5

फक्त ५ मिनिटांचा कार प्रवास, २,७१७ कोटींची डील; मुकेश अंबानींनी सांगितला 'जिओ ब्लॅकरॉक'च्या स्थापनेचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 14:31 IST

Reliance Jio-Blackrock Deal: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांच्या आणि ब्लॅकरॉकचे लॅरी फिंक यांच्यातील मल्टी-मिलियन डॉलरच्या कराराचा खुलासा केला.

Reliance Jio-Blackrock Deal: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांच्या आणि ब्लॅकरॉकचे लॅरी फिंक यांच्यातील मल्टी-मिलियन डॉलरच्या कराराचा खुलासा केला. हा करार कसा झाला आणि त्यातून 'जिओ ब्लॅकरॉक'ची निर्मिती कशी झाली, याची माहिती त्यांनी दिली. विशेष म्हणजे, हा संपूर्ण व्यवहार केवळ ५ मिनिटांच्या कार प्रवासादरम्यान ठरला. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मुंबईतील 'Investing for a New Era' या कार्यक्रमात ब्लॅकरॉकचे सीईओ लॅरी फिंक यांच्याशी संवाद साधताना या आठवणींना उजाळा दिला.

नेमकी कशी झाली ही मोठी डील?

मुकेश अंबानी यांनी सांगितलं की, "ही घटना २०२३ मधील एका संवादादरम्यानची आहे. लॅरी यांना 'ब्लॅकरॉकनं भारतात पुन्हा परतलं पाहिजे' हे सांगायला मला फक्त पाच मिनिटं लागली. त्यावर त्यांनी विचारलं, 'तुम्ही माझ्यासोबत भागीदारी कराल का?'" या एका साध्या संवादातून ३०० मिलियन डॉलरचा (सुमारे २,७१७ कोटी रुपये) जॉइंट व्हेंचर करार झाला. यामध्ये 'जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस' आणि 'ब्लॅकरॉक' हे समसमान भागीदार आहेत.

कर्ज स्वस्तच, पण एफडीवर कात्री; कंपन्यांवरील नियमांचं ओझं केलं कमी, बांधकाम क्षेत्राला मिळणार बूस्टर

जगातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी

ब्लॅकरॉक ही जगातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन (Asset Manager) कंपनी असून ७३ वर्षीय लॅरी फिंक हे त्याचे सीईओ आहेत. डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत ही कंपनी १४ ट्रिलियन डॉलरची गुंतवणूक व्यवस्थापित करत होती. लॅरी फिंक यांनीही या डीलबद्दल माहिती दिली. "आम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायचं होतं आणि त्या छोट्याशा प्रवासातच आमची ही डील पूर्ण झाली," असं ते म्हणाले. तज्ज्ञांच्या मते, व्यवहाराचा हा वेग दोन अब्जाधीशांमधील संबंध आणि भारतातील वित्तीय सेवा उद्योगातील मोठ्या संधी दर्शवतो.

मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती

मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आहेत. रिलायन्स ही मीडिया, रिटेल, वित्तीय सेवा, तेल आणि वायू, टेलिकॉम आणि पेट्रोकेमिकल्स अशा विविध क्षेत्रांत पसरलेली १२५ अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेली कंपनी आहे. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी यांची निव्वळ संपत्ती १०३.८ अब्ज डॉलर इतकी आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 5-minute car ride seals $2.7B Jio-Blackrock deal: Ambani reveals story.

Web Summary : Mukesh Ambani revealed the Jio-Blackrock deal originated during a 5-minute car ride with Larry Fink. The $300 million joint venture was conceived swiftly, highlighting the strong relationship between the billionaires and the potential in India's financial sector.
टॅग्स :रिलायन्स जिओमुकेश अंबानीजिओ