Join us
Daily Top 2Weekly Top 5

मेंटेनन्स भरायचा नाही, उलट वर्षाला मिळणार २.५ लाख! मुंबईतील सोसायटीचे अजब मॉडेल; उद्योजकही थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 15:32 IST

Jolly Maker Society : स्वप्नांचे शहर मुंबईत, अगदी लहान घर खरेदी करणे देखील सामान्य व्यक्तीसाठी एक मोठा संघर्ष बनला आहे, त्यात मासिक देखभाल शुल्क देखील एक मोठा भार आहे. अशात मुंबईतील ही गृहनिर्माण वसाहत चर्चेचा विषय ठरली आहे.

Jolly Maker Society : मुंबई, पुणे किंवा बंगळुरू सारख्या शहरात फ्लॅट असणाऱ्यांसाठी दरमहा भराव्या लागणाऱ्या 'मेंटेनन्स चार्ज'चे टेन्शन मोठे असते. लिफ्ट, सुरक्षा आणि साफसफाईच्या नावाखाली हजारो रुपये खिशातून जात असताना, दक्षिण मुंबईत एक अशी सोसायटी आहे जिथे रहिवाशांना एक रुपयाही मेंटेनन्स भरावा लागत नाही. उलट, वर्षाच्या शेवटी सोसायटीच फ्लॅट मालकांच्या खात्यात २.५ लाख रुपये जमा करते. दक्षिण मुंबईतील 'जॉली मेकर' या पॉश सोसायटीच्या या अजब मॉडेलची सध्या देशभर चर्चा रंगली आहे.

पेटीएमच्या विजय शेखर शर्मांकडून कौतुकया सोसायटीच्या अनोख्या बिझनेस मॉडेलचा एक व्हिडिओ 'पेटीएम'चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर शेअर केला आणि तो क्षणात व्हायरल झाला. जिथे कफ परेड किंवा नरीमन पॉईंटसारख्या भागात लाखो रुपये मेंटेनन्स भरावा लागतो, तिथे ही सोसायटी रहिवाशांना नफा वाटत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

१९७० मधील 'ती' अट ठरली मास्टरस्ट्रोक!या यशस्वी मॉडेलची पायाभरणी १९७० च्या दशकात झाली होती. त्यावेळी बिल्डरने फ्लॅट विकताना एक विशेष अट घातली होती. फ्लॅट खरेदीदारांना नरीमन पॉईंट येथील एका कमर्शियल (व्यापारी) बिल्डिंगमध्ये सुद्धा हिस्सा घ्यावा लागेल. त्यावेळी ही अट ग्राहकांसाठी अतिरिक्त आर्थिक बोजा वाटत होती, मात्र आज तोच निर्णय रहिवाशांसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरला आहे.

५० लाखांचे मासिक भाडे आणि मेंटेनन्स फ्री आयुष्य

  • जॉली मेकर सोसायटीची नरीमन पॉईंट येथील त्या कमर्शियल बिल्डिंगमध्ये मोठी मालकी आहे.
  • या बिल्डिंगमधून सोसायटीला दरमहा सुमारे ५० लाख रुपये भाडे मिळते.
  • या भाड्याच्या रकमेतूनच सोसायटीचा सर्व खर्च (सुरक्षा, वीज, पाणी, कर्मचारी पगार) भागवला जातो.
  • सर्व खर्च वजा करून जी रक्कम उरते, ती वर्षाच्या शेवटी फ्लॅट मालकांना लाभांश म्हणून दिली जाते, जी साधारणपणे २ ते २.५ लाख रुपयांपर्यंत असते.

वाचा - रेल्वे बजेटचे 'आम' बजेटमध्ये विलीनीकरण; ९२ वर्षांचा इतिहास आणि मोदी सरकारचा 'तो' धाडसी निर्णय

केवळ घर नाही, तर 'स्मार्ट' गुंतवणूकआजच्या काळात जॉली मेकर टॉवरमध्ये घर असणे ही केवळ प्रतिष्ठेची गोष्ट नसून ती एक अत्यंत फायदेशीर गुंतवणूक ठरली आहे. मेंटेनन्सचे टेन्शन नसल्याने आणि उलट कमाई होत असल्याने या सोसायटीने भारतातील गृहनिर्माण संस्थांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Society Pays Residents: No Maintenance Fees, Plus ₹2.5 Lakh Yearly!

Web Summary : Mumbai's Jolly Maker society stuns with its unique model: residents receive ₹2.5 lakh annually instead of paying maintenance. Commercial property ownership generates enough rental income to cover expenses and provide dividends, setting a new standard for housing societies.
टॅग्स :मुंबईसुंदर गृहनियोजनपैसा