रिलायंस इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) संदर्भात मोठी घोषणा केली आहे. ज्याप्रमाणे रिलायंसने मोबाइल डेटाच्या किमती कमी केल्या, त्याच पद्धतीने आता AI चे दरही सर्वसामान्यांसाठी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. जिओ आणि आरआईएल मिळून एआयमध्ये पुढील ७ वर्षांत १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत, असे मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे. ते 'AI Impact Summit' मध्ये बोलत होते.
नोकऱ्यां कमी होणार नाहीत, उलट वाढणार...!AI मुळे मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या जातील, अशी भीती जगभरात व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात बोलताना अंबानी म्हणाले, "AI मुळे नोकऱ्या कमी होणार नाहीत. तर रोजगार क्षेत्रात बदल होईल. आम्ही हे सिद्ध करू की AI नोकऱ्या हिरावणार नाही, तर उच्च-कुशल कामाच्या नवीन संधी निर्माण करेल." तसेच, भारताकडे असलेल्या कुशल व्यावसायिकांच्या मोठ्या साठ्यामुळे देश या तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यास सज्ज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
काय आहे रिलायंसचा प्लॅन?अंबानी म्हणाले, "रिलायंस आणि जिओ भारतीय स्टार्टअप्स, IIT आणि संशोधन संस्थांसोबत मिळून AI तंत्रज्ञानाचा वेग वाढवणार आहेत. कंपनीचा भर प्रामुख्याने विश्वासार्ह आणि स्वस्त AI सोल्यूशन्सवर असेल. सध्या, संगणकीय शक्तीचा (Computing Power) जास्त खर्च आणि पायाभूत सुविधांची कमतरता ही मोठी आव्हाने असून, त्यावर मात करण्यासाठी 'जिओ इंटेलिजन्स' भारतासाठी एक सार्वभौम कॉम्प्युटिंग फ्रेमवर्क स्थापन करेल."
जामनगरमध्ये कामही सुरू -या प्रकल्पासाठी जामनगरमध्ये डेटा सेंटरचे काम आधीच सुरू झाले आहे. २०२६ च्या अखेरीस १२० मेगावॅट क्षमतेचे कार्यान्वित करण्याचे ध्येय आहे. हे गिगावॅट पातळीपर्यंत आणखी वाढवले जाईल. विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकल्प हरित ऊर्जेवर (Green Energy) आधारित असेल.
Web Summary : Mukesh Ambani announces Reliance will invest $12 billion in AI over seven years, aiming to democratize access and create jobs. The company will collaborate with startups and IITs, focusing on affordable solutions. A green energy-powered data center is being built in Jamnagar.
Web Summary : मुकेश अंबानी ने घोषणा की कि रिलायंस सात वर्षों में एआई में 12 बिलियन डॉलर का निवेश करेगी, जिसका उद्देश्य पहुंच को लोकतांत्रिक बनाना और नौकरियां पैदा करना है। कंपनी स्टार्टअप और आईआईटी के साथ सहयोग करेगी, किफायती समाधानों पर ध्यान केंद्रित करेगी। जामनगर में हरित ऊर्जा से चलने वाला डेटा सेंटर बनाया जा रहा है।