Iran-Israel Crisis: मध्यपूर्वेतील तणावामुळे जागतिक पातळीवर तेल आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असून, अनेक देशांमध्ये ऊर्जा संकट तीव्र होत आहे. मात्र भारतात सध्या तेल आणि गॅसचा पुरेसा साठा असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचेही सरकारने सांगितले. या पार्श्वभूमीवर काही शेजारी देश ऊर्जा पुरवठ्यासाठी भारतावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असल्याचे चित्र समोर आले आहे.
जगभरात ऊर्जा संकट; भारतात पुरेसा साठा
मध्यपूर्वेतील संघर्षामुळे भारत आणि चीनने आधीच पुरेसे इंधन साठे निर्माण करून परिस्थितीवर नियंत्रण ठेवले आहे. मात्र, काही भागांमध्ये घबराटीच्या वातावरणामुळे एलपीजी पुरवठ्याबाबत तात्पुरत्या समस्या दिसून आल्या आहेत. याउलट पाकिस्तान आणि बांगलादेशसारख्या काही देशांमध्ये ऊर्जा संकट तीव्र झाले असून, त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या आयुष्यावर पडत आहे.
भारतावर अवलंबून पाच शेजारी देश
सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तान वगळता दक्षिण आशियातील पाच शेजारी देश ऊर्जा पुरवठ्यासाठी भारतावर अवलंबून आहेत. यात नेपाळ, बांगलादेश, भुतान, म्यानमार आणि श्रीलंकेचा समावेश आहे. मिडल ईस्टमधील तणावामुळे या देशांमध्येही पेट्रोलियम उत्पादनांच्या पुरवठ्यावर दबाव निर्माण झाला आहे.
या देशांना तेल-गॅस कसे पोहोचते?
नेपाळला भारतातून पाइपलाइन आणि टँकरद्वारे तेल-गॅस पुरवठा केला जातो. विशेषतः मोतीहारी-अमलेखगंज पेट्रोलियम पाइपलाइनमार्फत भारतातून नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात तेल पाठवले जाते. भारताच्या जवळ असल्याने नेपाळला कमी खर्चात पेट्रोलियम उत्पादने मिळतात. बांग्लादेशला भारतातून पाइपलाइन, तसेच समुद्री मार्गाने इंधन पुरवठा केला जातो. भुटानची 100 टक्के पेट्रोलियम गरज भारतातून पूर्ण होते. म्यानमारला रस्ता आणि समुद्री मार्गाने तेल पुरवले जाते, तर श्रीलंका मुख्यतः समुद्री जहाजांद्वारे भारतातून पेट्रोलियम उत्पादने आयात करतो.
भारतातून किती तेल निर्यात?
- नेपाळ : दरवर्षी सुमारे १.६ ते १.८ मिलियन टन पेट्रोलियम उत्पादने आयात करतो. याचा पुरवठा प्रामुख्याने इंडियन ऑईलमार्फत केला जातो.
- बांग्लादेश : दरवर्षी सुमारे २.५ ते ३ मिलियन टन पेट्रोलियम उत्पादने आया करतो.
- श्रीलंका : दरवर्षी अंदाजे १ ते १.५ मिलियन टन इंधन आयात करतो.
- भुटान : दरवर्षी सुमारे ०.१५5 ते ०.२ मिलियन टन पेट्रोलियम उत्पादने भारतातून आयात करतो.
- म्यानमार : दरवर्षी अंदाजे ०.४ ते ०.६ मिलियन टन पेट्रोलियम उत्पादने आयात करतो.
एकूण मिळून भारत या देशांना दरवर्षी सुमारे ६ ते ७ मिलियन टन पेट्रोलियम उत्पादने निर्यात करतो.
Web Summary : Mideast tensions impact global energy. India has ample reserves, aiding Nepal, Bangladesh, Bhutan, Myanmar, and Sri Lanka with vital oil and gas supplies via pipelines and sea routes. These nations import millions of tons annually.
Web Summary : मध्य पूर्व के तनाव से वैश्विक ऊर्जा प्रभावित। भारत के पास पर्याप्त भंडार हैं, जो नेपाल, बांग्लादेश, भूटान, म्यांमार और श्रीलंका को पाइपलाइन और समुद्री मार्गों से महत्वपूर्ण तेल और गैस की आपूर्ति में मदद करते हैं। ये देश सालाना लाखों टन आयात करते हैं।