Join us
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 09:44 IST

Post Office Investment Tips: सध्याच्या काळात गुंतवणूक ही महत्त्वाची झाली आहे. आपात्कालिन परिस्थिती असो किंवा काही महत्त्वाची कामं यावेळी ही आर्थिक गुंतवणूक कामी येते. शेअर बाजारात अधिक नफा मिळत असला तरी त्यात जोखीम अतिशय जास्त असते.

Post Office Investment Tips: सध्याच्या काळात गुंतवणूक ही महत्त्वाची झाली आहे. आपात्कालिन परिस्थिती असो किंवा काही महत्त्वाची कामं यावेळी ही आर्थिक गुंतवणूक कामी येते. शेअर बाजारात अधिक नफा मिळत असला तरी त्यात जोखीम अतिशय जास्त असते. त्यामुळे आजही अनेक लोक गुंतवणूकीच्या सुरक्षित पर्यायांनाच प्राधान्य देताना दिसतात. आपले पैसे सुरक्षित ठेवायचे असतील आणि त्यावर उत्तम परतावाही मिळवायचा असेल तर पोस्टाच्या स्कीम्स उत्तम ठरू शकतात.

पोस्ट ऑफिस आता विविध प्रकारच्या बँकिंग सेवाही पुरवते. बचत खात्यांबरोबरच पोस्ट ऑफिसमध्ये एफडी खातंही उघडता येतं. पोस्ट ऑफिसमधील एफडीला टीडी (Time Deposit) म्हणतात. पोस्ट ऑफिसची टीडी ही बँकांच्या एफडीसारखीच असते, ज्यामध्ये तुम्हाला ठराविक वेळी ठराविक रक्कम मिळते. देशातील अनेक लोक कर वाचवण्यासाठी पत्नीच्या नावानं बचत खाती उघडतात. आज आपण येथे जाणून घेणार आहोत की जर तुम्ही पत्नीच्या नावावर २ वर्षांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये २ लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील.

₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव

२ वर्षांच्या टीडीवर ७.० टक्के व्याज

पोस्ट ऑफिसमध्ये ४ वेगवेगळ्या कालावधीसाठी टीडी खातं उघडता येतं. पोस्ट ऑफिसमध्ये १ वर्ष, २ वर्ष, ३ वर्ष आणि ५ वर्षांसाठी टीडी खातं उघडता येतं. पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना १ वर्षाच्या टीडीवर ६.९ टक्के, २ वर्षांच्या टीडीवर ७ टक्के, ३ वर्षांच्या टीडीवर ७.१ टक्के आणि ५ वर्षांच्या टीडीवर ७.५ टक्के बंपर व्याज देत आहे. पोस्ट ऑफिसटीडी स्कीममध्ये किमान एक हजार रुपये जमा करता येतात. जास्तीत जास्त डिपॉझिट लिमिट नाही. या योजनेत तुम्ही हवे तेवढे पैसे जमा करू शकता.

२ लाख रुपये जमा केल्यास किती पैसे मिळतील?

पोस्ट ऑफिसमध्ये सर्व प्रकारच्या ग्राहकांना समान व्याज मिळतं. आता स्त्री असो वा पुरुष, सामान्य नागरिक असो वा ज्येष्ठ नागरिक पोस्ट ऑफिस सर्वांना समान व्याज दिलं जातं. जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर पोस्ट ऑफिसमध्ये 2 वर्षांच्या टीडीमध्ये (एफडी) २ लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर तुमच्या पत्नीच्या खात्यात एकूण २,२९,७७६ रुपये जमा होतील. यामध्ये तुमच्या गुंतवणुकीच्या २,००,००० रुपयांव्यतिरिक्त २९,७७६ रुपयांच्या व्याजाचा समावेश आहे. पोस्ट ऑफिसच्या टीडी स्कीमवर ग्राहकांना गॅरंटीसह निश्चित व्याजही मिळतं, ज्यात कोणत्याही प्रकारचे चढ-उतार नसतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Invest 2 Lakhs in Post Office for Wife, Double Returns!

Web Summary : Post Office offers secure investment options like Time Deposits (TDs). Investing ₹2 lakhs in a 2-year TD for your wife yields ₹2,29,776 upon maturity, including ₹29,776 interest. Fixed interest rates guarantee returns, regardless of market fluctuations.
टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूकपैसा