Join us
Daily Top 2Weekly Top 5

साधे जीवन, पण अब्जावधींचे साम्राज्य! खामेनेई यांच्या अदृष्य संपत्ती पाहून तुमचेही डोळे दिपतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 11:23 IST

Ayatollah Khamenei : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनई यांची अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात हत्या करण्यात आली. खामेनींचे संपूर्ण इराणवर नियंत्रण होते.

Ayatollah Khamenei : अमेरिका आणि इस्रायलनेइराणवर केलेल्या भीषण हल्ल्यात सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. सलग ३६ वर्षे इराणवर एकछत्र अंमल गाजवणाऱ्या खामेनेईंच्या निधनामुळे केवळ राजकीय पोकळी निर्माण झाली नाही, तर जगातील सर्वात मोठ्या आणि रहस्यमय 'आर्थिक साम्राज्या'च्या भविष्यावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. स्वतःला साध्या धार्मिक नेत्याच्या रूपात सादर करणाऱ्या खामेनेईंच्या नियंत्रणाखाली अब्जावधी डॉलर्सची मालमत्ता होती, जी इराणमधील सर्वात मोठे गुपित मानली जात असे.

'सेताद' : खामेनेईंच्या सत्तेचा आर्थिक कणा खामेनेईंची संपत्ती कोणत्याही खाजगी बँक खात्यात नव्हती, तर ‘सेताद’ नावाच्या एका महाकाय संघटनेच्या माध्यमातून ती नियंत्रित केली जात असे. १९७९ च्या क्रांतीनंतर जप्त करण्यात आलेली रिअल इस्टेट, कॉर्पोरेट शेअर्स आणि तेल उद्योगातील मालमत्ता यातून हे साम्राज्य उभे राहिले. ही संघटना इराणची संसद किंवा कोणत्याही सार्वजनिक संस्थेला उत्तरदायी नव्हती. ती थेट सर्वोच्च नेत्याच्या आदेशावर चालत असे. २०१३ मध्ये रॉयटर्सच्या तपासणीत ही मालमत्ता ९५ अब्ज डॉलर्स (सुमारे ८.५५ लाख कोटी रुपये) असल्याचे समोर आले होते.

इराणच्या प्रत्येक क्षेत्रात 'सेताद'चा वाटा ताज्या अहवालानुसार (२०२५-२०२६), खामेनेईंच्या नियंत्रण क्षेत्रातील मालमत्तेचे मूल्य आता २०० अब्ज डॉलर्सच्या घरात गेले आहे. केवळ रोख रक्कमच नाही, तर इराणच्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर त्यांचे वर्चस्व होते. बँकिंग, दूरसंचार, कृषी, तेल उद्योग तसेच पायाभूत सुविधा आणि वित्तीय गुंतवणूक मोठी होती.

वाचा - युद्धामुळे कमोडिटी बाजारात भूकंप! सोने आणि कच्चे तेल महागणार; भारतीयांवर काय परिणाम होईल?

साधेपणा की केवळ देखावा? खामेनेई तेहरानमधील एका साध्या घरात राहत असत आणि त्यांच्या समर्थकांच्या मते त्यांच्याकडे कोणतीही वैयक्तिक मालमत्ता नव्हती. मात्र, आंतरराष्ट्रीय विश्लेषकांच्या मते, हे केवळ एक 'धोरणात्मक साधेपण' होते. ते स्वतः विलासी जीवन जगत नसले तरी, संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था नियंत्रित करणाऱ्या व्यवस्थेचे ते 'मालक' होते. इराण सरकारने हे सर्व दावे नेहमीच 'पाश्चात्य देशांचा अपप्रचार' म्हणून फेटाळून लावले आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Khamenei's hidden wealth: A simple life, a billion-dollar empire.

Web Summary : Ayatollah Khamenei's death raises questions about his vast, secret financial empire, controlled through 'Setad'. This organization manages billions in assets seized after Iran's revolution, dominating key sectors like banking and oil. While Khamenei lived modestly, he oversaw an economy worth billions, claims the Iranian government denies.
टॅग्स :इराणइस्रायलअमेरिकाडोनाल्ड ट्रम्पयुद्धअयातुल्ला अली खामेनेई