Layoffs in Infosys : आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा आहे. कारण, गेल्या वर्षभरात अनेक आयटी कंपन्यांमध्ये नवीन नोकर भरती थंडावली आहे. तर दुसरीकडे आघाडीच्या कंपन्यांमध्ये नोकर कपात केली जात आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या आयटी कंपनी इन्फोसिसमध्ये कर्मचाऱ्यांची टाळेबंदी थांबण्याचे कोणतेही संकेत दिसत नाहीत. अंतर्गत मूल्यांकन चाचणीत नापास झालेल्या १९५ प्रशिक्षणार्थींना कंपनीने पुन्हा एकदा बाहेरचा रस्ता दाखवला आहे. याआधीही इन्फोसिसने दोनदा मूल्यांकन चाचणीत नापास झालेल्या प्रशिक्षणार्थींना नोकरीवरून काढून टाकले आहे.
फेब्रुवारी २०२५ च्या सुरुवातीला इन्फोसिसने मूल्यांकन चाचणीत नापास झालेल्या ३२० प्रशिक्षणार्थींना नोकरीवरून काढून टाकले होते. मूल्यांकन चाचणीत नापास झाल्यानंतर कंपनीने या महिन्याच्या एप्रिलच्या सुरुवातीलाच २४० प्रशिक्षणार्थींना कामावरून काढून टाकले आहे. आता पुन्हा एकदा इन्फोसिसने १९५ प्रशिक्षणार्थी व्यावसायिकांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
यावर्षी १५,००० प्रशिक्षणार्थींना नोकरीइन्फोसिसने गेल्या आर्थिक वर्षात एकूण १५,००० प्रशिक्षणार्थींना नियुक्त केले होते. या प्रशिक्षणार्थींची निवड कंपनीने २०२२ मध्ये कॅम्पस सिलेक्शनमध्ये केली होती. पण, ३ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, इन्फोसिसने त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्त केले. म्हणजे नोकरी मिळवण्यासाठी ३ वर्ष थांबावे लागले. आणि काही महिन्यातच त्यांना कामावरुन काढून टाकण्यात आलं. यावर्षी कंपनीचा महसूल मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. इन्फोसिसने आर्थिक वर्ष २६ साठी ०-३ टक्के महसूल वाढीचा अंदाज वर्तवला आहे. येत्या काळात कंपनी २० हजार फ्रेशर्सना नोकरीवर ठेवणार आहे.
वाचा - अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
इन्फोसिस चालवते प्रशिक्षण अभ्यासक्रम इन्फोसिसने त्यांच्या प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांसाठी NIIT आणि UPGrad प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केले आहेत. आतापर्यंत, अपग्रेड आणि एनआयआयटीकडून २५० प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण घेतले असून सुमारे १५० प्रशिक्षणार्थींनी आउटप्लेसमेंटसाठी नोंदणी केली आहे. इन्फोसिसच्या या प्रशिक्षण अभ्यासक्रमांमुळे प्रशिक्षणार्थी त्यांचे मूल्यांकन उत्तीर्ण होऊ करू शकले नाहीत.