Join us

महिंद्राच्या नवीन इलेक्ट्रिक कारवर बंदी येणार? इंडिगो एअरलाईन्सने खेचलं कोर्टात; काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 13:04 IST

Indigo-Mahindra Case: इंडिगोने महिंद्राविरुद्ध खटला दाखल केला असून कंपनीच्या 6e ट्रेडमार्क असलेल्या ब्रँडच्या वापरावर बंदी घालण्याची विनंती न्यायालयाला केली आहे.

Indigo vs Mahindra 6e Update : देशात इलेक्ट्रिक वाहनांचा खप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रस्त्यांवर आता इलेक्ट्रिक वाहने धावताना पाहायला मिळत आहे. साहजिकच वाहन निर्मिती क्षेत्रातील मोठे खेळाडू यात उतरले आहेत. महिंद्रा कंपनीने नुकतीच आपली एसयूव्ही प्रकारातील दमदार इलेक्ट्रिक कार बाजारात उतरवून खळबळ उडवून दिली आहे. या गाडीचा दमदार व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मात्र, ही गाडी रस्त्यावर धावण्याआधीच वादात सापडली आहे. देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगोनेमहिंद्राला कोर्टात खेचलं आहे. ट्रेडमार्कचे उल्लंघन केल्याचा इंडिगोचा आरोपदेशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगो (Indigo) आणि आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra and Mahindra) यांच्यात '6E' ट्रेडमार्कच्या वापरावरून कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. इंडिगोची मूळ कंपनी इंटरग्लोब एव्हिएशनने महिंद्रा अँड महिंद्राच्या इलेक्ट्रिक वाहन युनिट महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल लिमिटेडविरुद्ध ट्रेडमार्क उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

महिंद्रा कंपनीकडून स्पष्टीकरणस्टॉक एक्स्चेंजमध्ये नियामक फाइलिंगमध्ये, महिंद्रा अँड महिंद्राने सांगितले की, कंपनीची उपकंपनी महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल लिमिटेडने २६ नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांच्या इलेक्ट्रिक ओरिजिन एसयूव्ही, BE 6e आणि XEV 9e अशा २ कार लाँच केल्या आहेत. यासाठी महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईलने क्लास १२ (वाहने) अंतर्गत BE 6e च्या ट्रेडमार्क नोंदणीसाठी अर्ज केला आहे. 

महिंद्रा इलेक्ट्रिक इंडिगोशी चर्चा करणारमहिंद्रा अँड महिंद्राने या प्रकरणावर स्पष्टीकरण दिल आहे. ते म्हणाले, की कंपनीला यात कोणताही वाद दिसत नाही. कारण BE 6e हा 6E ट्रेडमार्क नाही. इंडिगोच्या 6E ट्रेडमार्कपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. इंडिगोचे 6E एअरलाइन्सचे प्रतिनिधित्व करते. यात कोणत्याही प्रकारचा गोंधळ नाही. दोन्ही उत्पादने वेगळी आहेत. इतकेच नाही तर महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईलने ट्रेडमार्क उल्लंघनाबाबत इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेडच्या तक्रारीची दखल घेतली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी कंपनी आणि महिंद्रा इलेक्ट्रिक इंडिगोशी चर्चा करत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी कंपनी आणि महिंद्रा इलेक्ट्रिक इंडिगोशी चर्चा करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

इंडिगोची मागणी काय?देशाच्या देशांतर्गत विमान वाहतूक क्षेत्रात इंडिगोचा ६० टक्के हिस्सा आहे. कंपनी दीर्घ काळापासून ब्रँडिंगसाठी 6E ट्रेडमार्क वापरत आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इंडिगोने दाखल केलेल्या खटल्यात म्हटले आहे की, महिंद्राने जाणीवपूर्वक स्वतःला विमान वाहतूक उद्योगाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची कार विमानाच्या कॉकपिटसारखी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्ली हायकोर्टात केस दाखल करून इंडिगोने महिंद्राच्या या निर्णयावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :महिंद्राइंडिगोइलेक्ट्रिक कारइलेक्ट्रिक कार / स्कूटर