Join us  

India's Top Source For Gold : भारत कुठून खरेदी करतो सोनं? अर्धे तर या छोट्याशा देशाकडून मागवतो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 6:47 AM

भारतात सोन्याला प्रचंड महत्त्व दिले जाते. येथे काही लोक सोन्याचे दागिने पसंत करतात तर काही लोक सोन्याकडे गुंतवणुकीचा एक सर्वोत्तम पर्याय म्हणूनही पाहतात.

देशात सणासुदीचा हंगाम (Festive Season) सुरू झाला असून लोक दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या तयारीला लागले आहेत. अशा वेळी लोक सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्यासही अधिक प्राधान्य देतात. यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्यानेही सोन्या-चांदीच्या (Diwali-Dhanteras) दागिन्यांची मागणीही वाढण्याची शक्यता आहे. मात्र, आपण दुकानांतून खरेदी करतात, ते सोने येते कोठून हे तुम्हाला माहीत आहे का? तर, भारत आपल्या गरजेपेक्षाही जवळपास अर्धे सोने एका छोट्या देशाकडून खरेदी करतो.

सोन्याचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा आयातदार -भारतात सोन्याला प्रचंड महत्त्व दिले जाते. येथे काही लोक सोन्याचे दागिने पसंत करतात तर काही लोक सोन्याकडे गुंतवणुकीचा एक सर्वोत्तम पर्याय म्हणूनही पाहतात. जगभरातील शेअर बाजार कोसळला अथवा एखादे आर्थिक संकट आले की सोन्याची मागणी वाढते, असे अनेकवेळा दिसून आले आहे. या बाबतीत तर भारतीय सर्वात पुढे आहेत. यामुळेच भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा आयातदार देश आहे. भारत हा आपल्या आवश्यकतेच्या जवळफास अर्धे सोने स्वित्झरलँडकडून (Switzerland) खरेदी करतो.

स्वित्झरलँडहून होते जवळपास अर्ध्या सोन्याची आयात - स्वित्झर्लंड व्यतिरिक्त भारत संयुक्त अरब अमिराती (UAE), दक्षिण आफ्रिका, गिनी (Guinea) आणि पेरू (Peru) यांसारख्या देशांमधूनही सोन्याची आयात करतो. 2021-22 या आर्थिक वर्षातील सोन्याच्या आयातीसंदर्भातील आकडेवारी पाहता, या काळात भारताने एकट्या स्वित्झरलँडकडून 45.8 टक्के सोन्याची आयात करतो. यानंतर देशाने सर्वाधिक 12.7 टक्के सोने यूएईकडून खरेदी केले आहे. विविध देशांकडून आयात केलेले अधिकांश सोने चेन्नई, तसेच दिल्लीत उतरवले जाते.

...म्हणून Swiss Gold ची डिमांड अधिकस्वित्झरलँड हा युरोपमधील एक छोटा देश बऱ्याच काळापासून भारताच्या सर्वात मोठ्या आयातदार देशांच्या यादीत सर्वात वरच्या स्थावर आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, हा देश जगातील सर्वात मोठी गोल्‍ड रिफाइनिंग सेंटर असलेला देश आहे. एवढेच नाही, तर स्विस सोन्याची गुणवत्ता ही जगातील इतर देशांच्या सोन्यापेक्षाही अधिक चांगली असते, असे मानले जाते. यामुळेच खरेदीदारांमध्येही स्विस सोन्याला मोठी मागणी आहे.

टॅग्स :सोनंस्वित्झर्लंडसंयुक्त अरब अमिरातीभारत