LPG ATM : ज्याप्रमाणे आपण बँकेच्या एटीएममधून पैसे काढतो, अगदी त्याच धर्तीवर आता गॅस सिलेंडरही उपलब्ध होणार आहे. नॅशनल कॅपिटल रिजनमधील गुरुग्राम हे अशा प्रकारचे 'एलपीजी एटीएम' सुरू करणारे देशातील पहिले शहर ठरले आहे. सेक्टर ३३, सोहना येथील 'सेंट्रल पार्क फ्लॉवर व्हॅली'मध्ये ही अत्याधुनिक 'स्मार्ट वेंडिंग मशीन' बसवण्यात आली असून, यामुळे ग्राहकांना अवघ्या दोन ते तीन मिनिटांत भरलेला गॅस सिलेंडर उपलब्ध होणार आहे.
काय आहे 'एलपीजी एटीएम'?भारतगॅसने विकसित केलेली ही 'इंस्टा एलपीजी' मशीन पूर्णपणे डिजिटल आणि स्वयंचलित आहे. ज्या ग्राहकांकडे भारतगॅसचे 'कंपोजिट सिलेंडर' कनेक्शन आहे, त्यांना या सुविधेचा लाभ घेता येईल.
सिलेंडर मिळवण्याची प्रक्रिया
- मशिनवर आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर नोंदवा.
- प्राप्त झालेला ओटीपी टाकून पडताळणी करा.
- तुमच्याकडील रिकाम्या सिलेंडरवर असलेला बारकोड किंवा QR कोड स्कॅन करा.
- यूपीआय किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट करा.
- पेमेंट यशस्वी झाल्यावर मशीनमधून भरलेला सिलेंडर बाहेर येईल आणि रिकाम्या सिलेंडरचा मशीन स्वीकार करेल.
गॅस एजन्सीला मिळणार 'स्मार्ट' अलर्टया मशीनची साठवणूक क्षमता १० सिलेंडरची आहे. यातील साठा कमी होऊन जेव्हा फक्त दोन सिलेंडर शिल्लक राहतात, तेव्हा ही मशीन स्वयंचलितपणे जवळच्या गॅस एजन्सीला 'अलर्ट' पाठवते. यामुळे एजन्सीला वेळेत सिलेंडरचा पुरवठा करणे सोपे जाते. सध्या ही सुविधा नवीन असल्याने अनेक ग्राहकांना याची माहिती नाही, मात्र आगामी काळात हे मॉडेल लोकप्रिय ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
वाचा - सोने 'मौल्यवान' तर चांदी 'स्वस्त' का? जाणून घ्या या दोन धातूंमधील किमतीच्या फरकाचे अर्थकारण
कम्पोजिट सिलेंडरया एटीएममधून मिळणारे 'कम्पोजिट सिलेंडर' हे पारंपारिक लोखंडी सिलेंडरपेक्षा वेगळे आहेत. लोखंडी सिलेंडरचे एकूण वजन साधारण ३१ किलो (१४ किलो गॅससह) असते, तर फायबर-आधारित कम्पोजिट सिलेंडरचे वजन केवळ १५ किलो असते. यामुळे ते उचलणे सोपे जाते. या सिलेंडरची बॉडी काहीशी पारदर्शक असल्याने, ग्राहकांना सिलेंडर न हलवताही त्यातील गॅसची पातळी सहज पाहता येते.
Web Summary : Gurugram introduces India's first LPG ATM, offering Bharatgas composite cylinders in minutes. This digital, automated machine alerts the gas agency when stocks are low. Composite cylinders are lighter and allow users to see the gas level.
Web Summary : गुरुग्राम में भारत का पहला एलपीजी एटीएम शुरू, मिनटों में भारत गैस कंपोजिट सिलेंडर उपलब्ध। यह डिजिटल, स्वचालित मशीन स्टॉक कम होने पर गैस एजेंसी को अलर्ट करती है। कंपोजिट सिलेंडर हल्के होते हैं और गैस स्तर देखने की अनुमति देते हैं।