नवी दिल्ली : आजही भारतात सोने खरेदी करणे हे संपत्ती खरेदी करण्यापेक्षा अधिक शुभ मानले जाते. लग्नसमारंभात सोन्याचे हार, बांगड्या, झुमके आणि सोन्याचे मंगळसूत्र देणे मुलीला देण्याची एक परंपरा आहे. याच कारणामुळे भारतीय महिलांचा सोन्याशी विशेष आणि जिव्हाळ्याचा संबंध आहे. यामुळेच अमेरिका आणि युरोपातील देशांच्या तुलनेत भारतीय महिलांकडे सर्वाधिक सोने आहे. भारतीय महिलांकडे अमेरिकेच्या जर्मनी, इटली, फ्रान्स आणि रशियाच्या महिलांकडील सोन्याच्या एकत्रित साठ्याच्या तुलनेत ११ टक्के अधिक सोने आहे.
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या माहितीनुसार, भारतीय महिलांकडे सुमारे २४ हजार टन सोने आहे. हे जगातील एकूण सोन्याच्या सुमारे ११% इतके आहे. हे सोने वर्षानुवर्षे भारतीय कुटुंबाकडे असते.
सर्वाधिक सोने कोणत्या राज्यात?- दक्षिणेकडील राज्यांमध्ये सोन्याचे विशेष आकर्षण आहे. त्यामुळेच दक्षिण भारतात सोन्याच्या एकूण साठ्यापैकी ४० टक्के इतके सोने आहे.- एकट्या तामीळनाडू या राज्यात असलेल्या सोन्याचे प्रमाण २८ टक्के इतके आहे.
घराघरांमध्ये किती सोने?वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या २०२०-२१ च्या अहवालानुसार भारतीय घरांमध्ये २१ हजार ते २३ हजार टन इतके सोने होते.२०२३ मध्ये याचे प्रमाण २४ हजार ते २५ हजार टनांच्या घरात पोहोचले आहे.एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे हा सोन्याचा ठेवा चालत आलेला असतो. यात सातत्याने भर पडत असते. २०२४ मध्ये सोन्याच्या किमती २८ टक्के वाढल्या. २०२५ मध्येही किमती वाढण्याचा अंदाज कौन्सिलने वर्तवविला आहे.