Join us
Daily Top 2Weekly Top 5

Indian Railways Crisis: '...तर रेल्वेमध्येही इंडिगोसारखी परिस्थिती उद्भवू शकते, थकव्यामुळे धोका वाढवतोय;' आता लोको पायलट्सनं दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 14:04 IST

Indian Railways Loco Pilot: इंडिगोच्या कामकाजात आलेल्या अडथळ्यामुळे विमान वाहतूक क्षेत्रात जे संकट आलं आहे, तेच संकट भारतीय रेल्वेतील लोको पायलटांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्यांसारखंच आहे. पाहा काय आहे लोको पायलट्सची मागणी.

इंडिगोच्या (IndiGo) कामकाजात आलेल्या अडथळ्यामुळे विमान वाहतूक क्षेत्रात जे संकट आलं आहे, तेच संकट भारतीय रेल्वेतील लोको पायलटांच्या (Loco Pilots) दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्यांसारखंच आहे. कारण लोको पायलट देखील ऑपरेशनल सुरक्षेसाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून तयार केलेल्या कामाच्या वातावरणाची मागणी करत आहेत, असं एका लोको पायलट युनियननं सोमवारी म्हटलं.

लोको पायलट्सच्या कमी संख्येवर इशारा

कर्मचारी दलाच्या मोठ्या भागाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या 'ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशन' (AILRSA) या संघटनेने सांगितलं की, इंडिगोचा वाद केवळ विमान वाहतूक क्षेत्रातील मुद्दा नाही. हा सर्वच अधिक जोखीम असलेल्या उद्योगांसाठी एक इशारा आहे. एआयएलआरएसएचे सरचिटणीस के. सी. जेम्स यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, "आकाशात असो वा रेल्वेमध्ये, कामगारांचा थकवा थेट प्रवासी सुरक्षेसाठी धोक्यात बदलतो. आधुनिक स्लिप सायन्सवर आधारित नियम ही केवळ ड्युटी टाळण्यासाठी युनियनची मागणी नाही, तर ही सुरक्षा मानकांची मागणी आहे."

सध्याचे विमान वाहतूक संकट रेल्वे व्यवस्थापनासाठी डोळे उघडणारे असले पाहिजे. लाखो प्रवाशांचे जीवन एअरलाइन्सपेक्षा लोको पायलटांच्या सतर्कतेवर अधिक अवलंबून आहे, कारण रेल्वेमध्ये तांत्रिक प्रगती हवाई मार्गापेक्षा खूपच कमी आहे, असंही त्यांनी नमूद केलं. असोसिएशनचं म्हणणं आहे की लोको पायलट्सच्या थकव्यामुळे रेल्वे अपघातांचा धोका वाढत आहे आणि रेल्वेमध्येही इंडिगोसारखी परिस्थिती उद्भवू शकते.

लोको पायलट्सना पुरेसा आराम नाही

विमान वाहतूक संकटाच्या पार्श्वभूमीवर, युनियननं आपल्या मागण्यांचा पुनरुच्चार केला, जसं की जास्तीत जास्त दोन सलग रात्रीची ड्युटी, मानवी शरीराच्या अनुषंगाने योग्य ड्युटीचे तास आणि प्रत्येक ड्युटीनंतर पुरेसा आराम, तसंच आठवड्यात आरामाचा वेळ असावा.

युनियनने वेगवेगळ्या रेल्वे अपघातांच्या चौकशीचाही उल्लेख केला, ज्यामध्ये चालक दलाच्या कामाची वेळ अव्यवस्थित असल्याचं नमूद केलं गेलं आहे. त्यांनी दावा केला की, १७२ वर्ष जुन्या असलेल्या रेल्वेने कधीही आपल्या लोको पायलट्सच्या कामाच्या वेळेचे योग्य विश्लेषण करण्याची हिंमत केली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Loco Pilots Warn of Indigo-like Crisis in Indian Railways

Web Summary : Loco pilot union warns of potential crisis in Indian Railways similar to Indigo's issues, citing fatigue and demanding better working conditions for safety. They emphasize the need for adequate rest and regulated duty hours to prevent accidents due to overworked staff.
टॅग्स :भारतीय रेल्वेइंडिगोआरोग्यसंपरेल्वे