अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रात्री उशिरा, बहुप्रतिक्षित भारत-अमेरिका व्यापार कराराची घोषणा केली. याअंतर्गत भारतावर लादण्यात आलेला करही १८% पर्यंत कमी करण्यात आला आहे. दरम्यान आता भारत अमेरिकेकडून काय काय खरेदी करणार हा अनेकांच्या औत्सुक्याचा विषय आहे. तर, भारत अमेरिकेकडून, पेट्रोलियम, संरक्षण, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मास्युटिकल्स, टेलिकॉम उत्पादने आणि विमाने खरेदी करेल. तसेच, दोन्ही देशांतील चर्चेनंतर, ट्रेड डीलवर अधिकृत मोहर लवकरच लागेल, असा दावा रॉयटर्स या वृ्त्त संस्थेने केला आहे.या कराराचा उद्देश दोन्ही देशांमधील व्यापार तूट कमी करणे असा आहे. आगामी काळात याचा अनेक क्षेत्रांवर प्रभाव पडेल, असे बोलले जाते.
या डीलचा एक भाग म्हणून भारताने काही कृषी उत्पादनांसाठी आपली बाजारपेठ खुली करण्यासंदर्भातही भाष्यकेले आहे. मात्र याबाबतचा सविस्तर तपशील अद्याप उघड झालेला नाही, असे रॉयटर्सने संबंधित अधिकाऱ्याचा हवाला देत म्हटले आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत अमेरिकन वस्तूंवर '०' टक्के टॅरिफ लावेल, असा दावा केला असून तज्ज्ञ याचे विविध अर्थ काढत आहेत.
भारत करणार ५०० अब्ज डॉलरची खरेदी - राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या कराराला दुजोरा देताना म्हटले आहे की, भारत उच्च स्तरावर अमेरिकन उत्पादने खरेदी करण्यास तयार झाला आहे. तो ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत, ऊर्जा, कोळसा, तंत्रज्ञान, कृषी आणि इतर उत्पादने खरेदी करू शकतो.
ऑटोवर टॅरिफ कमी होणार - दोन्ही देशांतील व्यापारात संतुलन साधण्यासाठी अमेरिकेच्या विनंतीवरून भारताने ऑटोमोबाईलवरील टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अमेरिकन वाहने भारतीय बाजारपेठेत स्वस्त दरात उपलब्ध होऊ शकतात.
भारताने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही -या कराराचा पहिला हप्ता असून आगामी काळात चर्चेद्वारे याची व्याप्ती वाढू शकते. भारताच्या वाणिज्य मंत्रालयाने अद्याप यावर अधिकृत भाष्य केलेले नाही. आकडेवारीनुसार, जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान भारताची अमेरिकेला झालेली निर्यात १५.८८ टक्क्यांनी वाढून ८५.५ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे, तर आयात ४६.०८ अब्ज डॉलर इतकी राहिली आहे.
Web Summary : India, in a trade deal, will buy petroleum, defense items, electronics, pharmaceuticals, telecom products, and planes from the US. Auto tariffs may decrease.
Web Summary : भारत-अमेरिका व्यापार सौदे में भारत अमेरिका से पेट्रोलियम, रक्षा सामग्री, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मास्यूटिकल्स, दूरसंचार उत्पाद और विमान खरीदेगा। ऑटो टैरिफ कम हो सकते हैं।