लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : जागतिक घडामोडींमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डळमळीत झाल्याने शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सलग दोन दिवसांच्या तेजीला विराम देत प्रमुख निर्देशांक २ टक्क्यांहून अधिक कोसळले. यामुळे गुंतवणूकदारांचे एकाच दिवसांत ८.९१ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
सेन्सेक्स १,६९०.२३ अंकांनी घसरून ७३,५८३.२२ वर बंद झाला. निफ्टीही ४८६.८५ अंकांनी घसरून २२,८१९.६० वर स्थिरावला. अमेरिका-इराण तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा १०० डॉलरपार गेल्याने बाजारावर दबाव वाढला. ब्रेंट क्रूड ११० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले. परदेशी गुंतवणूकदारांकडून सातत्याने विक्री सुरू असल्याने परिस्थिती अधिकच बिघडली.
चांदीत ११,२५० घसरण, सोने १,९०० ने उतरले
जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी चांदीच्या दरात ११,२५० रुपये प्रतिकिलोची घसरण होऊन दर २.३० लाखांवर आले तर सोन्याच्याही किमतीत १,९००ची घसरण होऊन भाव १,४७,८०० रुपये प्रति १० ग्रॅमवर स्थिरावला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार, तसेच जागतिक आर्थिक संकेतांमुळे सोने-चांदीच्या किमतीत अस्थिरता वाढली आहे. अमेरिकेतील ग्राहक विश्वास निर्देशांक आणि महागाई अपेक्षांसंबंधी आकडेवारीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले असून, यावरून पुढील दिशा ठरणार आहे.
रुपया ८९ पैशांनी घसरून ९४.८५वर
शुक्रवारी रुपया तब्बल ८९ पैशांनी घसरत ९४.८५ प्रति डॉलर या आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर बंद झाला. अमेरिकन डॉलरची वाढलेली ताकद, पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेली अनिश्चितता आणि कच्च्या तेलाचे दर १०० डॉलरच्या वर कायम राहणे हे रुपयाच्या घसरणीमागील प्रमुख घटक ठरले आहे. रुपयाच्या घसरणीमुळे आयात महाग होण्याची शक्यता असून, पेट्रोल-डिझेलसह इतर महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
शेअर बाजारातील घसरण
एका दिवसात २.२५%एका आठवड्यात १.२०%१ महिन्यात १०.७४%३ महिन्यांत १३.३४%६ महिन्यांत ९%
एका डाॅलरसाठी किती माेजावे लागतात रुपये ?
१ एप्रिल २०२५ ८५.६, २७ मार्च २०२६, ९४.८५ १०% कोसळला रुपया आर्थिक वर्ष २०२६ मध्ये. यामुळे आयात बिल वाढून महागाई भडकली.
Web Summary : Global cues triggered a sharp market fall. Sensex plunged 1,690 points, wiping out ₹8.91 lakh crore of investor wealth. Rupee hits record low of 94.85 per dollar amid rising crude oil prices.
Web Summary : वैश्विक कारणों से बाजार में भारी गिरावट आई। सेंसेक्स 1,690 अंक लुढ़का, निवेशकों को ₹8.91 लाख करोड़ का नुकसान हुआ। कच्चे तेल की बढ़ती कीमतों के बीच रुपया 94.85 प्रति डॉलर के रिकॉर्ड निचले स्तर पर।