नवी दिल्लीः सध्या आपण गुंतवणुकीचा सुरक्षित मार्ग शोधत असल्यास अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कुठे गुंतवणूक करायची हे आपल्यावर निर्भर आहे. गुंतवणुकीत जास्त जोखीम उचललल्यास जास्त फायदा मिळतो. सुरक्षित गुंतवणुकीसाठीही सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास फायदेशीर ठरते. यासाठी आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचे चांगले पर्यायांची माहिती देणार आहोत. बँक फिक्स्ड डिपॉझिट(FD)जर आपल्याला सुरक्षित गुंतवणूक करायची असल्यास एफडी चांगला पर्याय आहे. बँक फिक्स्ड डिपॉझिट(FD)मध्ये पैसे गुंतवल्यास 12 वर्षांत दुप्पट फायदा मिळवूत देतात. SBIच्या 5 ते 10 वर्षांच्या एफडीवर 6 टक्के व्याज मिळतं. या योजनेत गुंतवलेले 1 लाख रुपये 12 वर्षांनंतर दोन लाख होतात. पोस्ट ऑफिस (FD)पोस्ट ऑफिसच्या योजनेत पैसा लवकर दुप्पट होतो. इथे 10 वर्षांत पैसे दुप्पट होतात. पोस्ट ऑफिसमध्ये टाइम डिपॉझिटचा पर्याय आहे. पाच वर्षांनंतर पुन्हा त्या योजनेत पैसे गुंतवता येतात. 10 वर्षांनी दुप्पटहून अधिक परतावा मिळतो.
'या' तीन योजनांत गुंतवलेला पैसा कमी कालावधीत होतो दुप्पट, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 20:20 IST