Join us
Daily Top 2Weekly Top 5

LPG बाबत महत्वाचे अपडेट! भारताचे देशांतर्गत गॅस उत्पादन घटले, आयातही निम्म्यावर आली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 19:36 IST

India LPG Crisis: अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाचा भारतावर थेट परिणाम

LPG supply in India: मध्यपूर्वेतील तणावामुळे भारतातील लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (LPG) पुरवठ्यावर गंभीर परिणाम निर्माण झाला आहे. एप्रिल महिन्यात LPG आयात मोठ्या प्रमाणात घटली असून, देशांतर्गत उत्पादनातही सुमारे १० टक्क्यांची घटले आहे. १ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान भारताने दररोज केवळ ३७,००० टन LPG आयात केली, जी फेब्रुवारीमध्ये ७३,००० टन प्रतिदिन होती.

आयात जवळपास ५०% नी घटली

अमेरिका सर्वात मोठा पुरवठादार असला तरी, भारत अजूनही खाडी देशांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. तज्ज्ञांच्या मते, जागतिक LPG व्यवहार मोठ्या प्रमाणात दीर्घकालीन करारांवर आधारित असल्याने तात्काळ अतिरिक्त पुरवठा मिळवणे कठीण ठरत आहे.

मागणी वाढतेय, पुरवठा कमी

देशांतर्गत मागणी वाढत असताना पुरवठा घटत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनत आहे. अमेरिका-इराण दरम्यान शस्त्रसंधीच्या चर्चेच्या बातम्या समोर आल्या असल्या तरी, त्याचा प्रत्यक्ष पुरवठ्यावर अद्याप सकारात्मक परिणाम दिसून आलेला नाही.

पुरवठा पूर्ववत कधी होणार?

भारत मोठ्या प्रमाणात पश्चिम आशियातील देशांवर LPG साठी अवलंबून आहे. विशेषतः स्ट्रेट ऑफ होर्मुझ मार्गावरील अडथळे आणि प्रादेशिक संघर्षामुळे पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पुरवठा पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी किमान ३ वर्षे किंवा त्याहून अधिक काळ लागू शकतो. 

English
हिंदी सारांश
Web Title : India's LPG Crisis: Domestic Production Dips, Imports Plummet Amidst Middle East Tensions

Web Summary : India faces a looming LPG crisis as Middle East tensions slash imports by 50%. Domestic production also fell. Reliance on West Asia and Strait of Hormuz disruptions exacerbate the situation. Normalcy may take years, experts warn.
टॅग्स :एलपीजी गॅस टंचाईइंधन टंचाईअमेरिका-इस्रायल-इराण वॉरभारत