India Import Russian Oil: अमेरिकेनं रशियन तेल कंपन्यांवर बंदी घातली आहे आणि त्याचा परिणाम भारतावरही दिसून येत आहे. असं असूनही रशियाकडूनभारताला होणारी तेल आयात सुरूच आहे. अमेरिकन निर्बंधांनंतर रशियानं कच्चं तेल पाठवण्यासाठी दुसरा मार्ग शोधला आहे. रशियाकडून भारतात येणाऱ्या कच्च्या तेलाचा मोठा हिस्सा आता अशा छोट्या व्यापाऱ्यांमार्फत येत आहे, जे पूर्वी क्वचितच भारताला तेल विकत असत.
रशियाची मोठी तेल कंपनी 'रोसनेफ्ट' (Rosneft) कडून येणाऱ्या तेलाच्या प्रमाणात मोठी घट झाल्यामुळे हे घडत आहे. डेटा पुरवणारी कंपनी 'केप्लर' (Kpler) नुसार, या महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांत रशियाकडून आलेल्या एकूण तेलापैकी सुमारे ४३% हिस्सा (सुमारे ०.५ मिलियन बॅरल प्रतिदिन) अशाच पाच व्यापाऱ्यांकडून आलाय.
पोस्टात FD वर किती मिळतं व्याज; १,००,००० जमा केले तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या
या जहाजांद्वारे आलं कच्चं तेल
'इकोनॉमिक टाइम्स'च्या वृत्तानुसार, जानेवारीच्या १५ दिवसांत ज्या जहाजांतून कच्चं तेल भारतात आलं आहे, त्यांची नावं रेडवूड ग्लोबल सप्लाय (Redwood Global Supply), विस्टुला डेल्टा (Vistula Delta), एथोस एनर्जी (Ethos Energy), अल्गफ मरीन (Alghaf Marine) आणि स्लावियांस्क ईसीओ (Slavyansk ECO) अशी आहेत. हे व्यापारी डिसेंबर २०२५ पूर्वी सुमारे दोन वर्षांपर्यंत भारताला कच्च्या तेलाचे एकही जहाज पाठवत नव्हते. यापैकी रुसएक्सपोर्ट आणि स्लावियांस्क ईसीओ या रशियन कंपन्या आहेत, तर रेडवूड ग्लोबल सप्लाय, अल्गफ मरीन आणि विस्टुला डेल्टा या संयुक्त अरब अमिरातीशी (UAE) संबंधित आहेत.
निर्बंधांनंतर काय फरक पडला?
अमेरिकेच्या बंदीनंतरही 'रोसनेफ्ट' या महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांत भारताला तेल पुरवणारी दुसरी सर्वात मोठी रशियन कंपनी राहिली. परंतु केप्लरच्या आकडेवारीनुसार, रोसनेफ्टकडून येणाऱ्या तेलाचे प्रमाण २०२५ च्या सरासरीपेक्षा सुमारे ७५% कमी झाले असून ते आता २,२५,००० बॅरल प्रतिदिन इतकेच राहिले आहे.
- २०२५ मध्ये रोसनेफ्ट भारताला दररोज सरासरी ९,१२,००० बॅरल तेल पाठवत होतं.
- हे भारताच्या रशियाकडून होणाऱ्या एकूण तेल आयातीचे सुमारे ५३% होते.
- या महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांत रशियाकडून भारताची एकूण तेल आयात १.१७९ मिलियन बॅरल प्रतिदिन राहिली.
- हे २०२५ च्या सरासरीपेक्षा सुमारे ३०% कमी आहे.
- या एकूण आयातीत रोसनेफ्टचा वाटा घसरून केवळ १९% वर आला आहे.
लुकोइलची स्थिती काय?
निर्बंधांचा सामना करणाऱ्या 'लुकोइल' या कंपनीकडूनही तेलाची आवक खूप कमी झाली आहे. या महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांत लुकोइलने सुमारे ४३,००० बॅरल प्रतिदिन तेल पाठवले, जे गेल्या वर्षीच्या सरासरीपेक्षा ८४% कमी आहे. भारताच्या रशियन तेल आयातीत लुकोइलचा वाटा १६% वरून ४% पेक्षाही कमी झाला आहे.
'हा' पुरवठादार ठरला मोठा खेळाडू
आता रशियाकडून सर्वाधिक तेल पाठवणारा पुरवठादार 'रुसएक्सपोर्ट'बनला आहे. या महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांत त्यांनी सुमारे २,५५,००० बॅरल प्रतिदिन तेल पाठवले, जे रशियाकडून होणाऱ्या एकूण तेल आयातीचा सुमारे पाचवा हिस्सा आहे.
इतर व्यापाऱ्यांनीही केल मोठा पुरवठा
रेडवूड ग्लोबल सप्लाय: सुमारे २ लाख बॅरल प्रतिदिन.विस्टुला डेल्टा: १,४५,००० बॅरल प्रतिदिन.एथोस एनर्जी: ७४,००० बॅरल प्रतिदिन.अल्गफ मरीन: ५०,००० बॅरल प्रतिदिन.स्लावियांस्क ईसीओ: ४३,००० बॅरल प्रतिदिन.
कोणी तेल खरेदी थांबवली, कोणी सुरू ठेवली?
भारतीय खरेदीदार रशियन तेलाच्या मूळ स्रोताबाबत अधिक सावध झाले आहेत. प्रतिबंधित कंपन्यांशी संबंधित कोणत्याही मालवाहतुकीपासून ते वाचू इच्छितात. भारताची सर्वात मोठी रशियन तेल खरेदीदार कंपनी 'रिलायन्स इंडस्ट्रीज'नं या महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांत कोणतंही कच्चं तेल खरेदी केलेलं नाही. याशिवाय HPCL, HMEL आणि MRPL यांनीही रशियाकडून कच्चं तेल घेणे बंद केलंय. मात्र, इंडियन ऑईल (Indian Oil), रोसनेफ्ट समर्थित नायरा एनर्जी (Nayara Energy) आणि बीपीसीएल (BPCL) अजूनही रशियाकडून तेल खरेदी करत आहेत.
Web Summary : Despite US sanctions, Russian oil continues flowing to India, using new trade routes via smaller traders. Rosneft's share has decreased, while companies like Rusexport have increased supplies. Reliance Industries paused purchases, but others like Indian Oil continue buying.
Web Summary : अमेरिकी प्रतिबंधों के बावजूद, छोटे व्यापारियों के माध्यम से नए व्यापार मार्गों का उपयोग करते हुए रूसी तेल का प्रवाह भारत में जारी है। रोसनेफ्ट की हिस्सेदारी कम हो गई है, जबकि रुसएक्सपोर्ट जैसी कंपनियों ने आपूर्ति बढ़ा दी है। रिलायंस इंडस्ट्रीज ने खरीदारी रोक दी, लेकिन इंडियन ऑयल जैसे अन्य लोग खरीद जारी रखते हैं।