Join us

भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 08:39 IST

Sanctions on India: भारताला स्वस्त दरात कच्चे तेल मिळत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पहावत नाहीय म्हणून त्यांनी सहा भारतीय तेल खरेदीदार कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. 

नेहमीच भारताचा द्वेष करत आलेल्या अमेरिकेने भारतावर १ ऑगस्टपासून २५ टक्के टेरिफ लादण्याचा निर्णय घेतला आहे. त्याउलट पाकिस्तानसोबत ऑईल डील केली आहे. भारताला स्वस्त दरात कच्चे तेल मिळत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पहावत नाहीय म्हणून त्यांनी सहा भारतीय तेल खरेदीदार कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. 

जगभरातील २० कंपन्यांना लक्ष्य करून केलेल्या व्यापक कारवाईचा भाग म्हणून अमेरिकेने इराणी पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल्समध्ये व्यापार केल्याचा आरोप असलेल्या किमान अर्धा डझन भारतीय कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने बुधवारी निर्बंधांची घोषणा केली. 

भारतीय कंपन्यांवर जाणूनबुजून इराणी पेट्रोलियम उत्पादनांची खरेदी आणि व्यापारासाठी व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अमेरिकेने इराणवर निर्बंध लादले होते, त्याचे या कंपन्यांनी उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अल्केमिकल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, ग्लोबल इंडस्ट्रियल केमिकल्स लिमिटेड, ज्युपिटर डाई केम प्रायव्हेट लिमिटेड, रमणिकलाल एस गोसालिया अँड कंपनी, पर्सिस्टंट पेट्रोकेम प्रायव्हेट लिमिटेड आणि कांचन पॉलिमर्स या कंपन्यांवर निर्बंध लादण्यात आले आहेत.

या कारवाईमध्ये या कंपन्यांची अमेरिकेतील किंवा अमेरिकन व्यक्तींच्या नियंत्रणाखाली असलेली सर्व मालमत्ता गोठवण्यात आली आहे. तसेच अमेरिकन व्यक्ती आणि कंपन्यांना मंजूर कंपन्यांसोबत व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. भारताचे इराणसोबत मजबूत व्यापारी संबंध आहेत. तरीदेखील भारताने अमेरिकेला घाबरून २०१९ नंतर इराणकडून तेल खरेदी करणे कमी केले आहे. या निर्बंध लादलेल्या कंपन्यांनी २०२४ मध्ये मोठ्या प्रमाणावर पेट्रोलिअम उत्पादने, मिथेनॉल खरेदी केली होती. यात अल्केमिकल ही कंपनी आघाडीवर होती.  

टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पखनिज तेलभारतइराण