Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारत-ब्राझील संबंधांना नवी दिशा; द्विपक्षीय व्यापार करारावर आज अखेर शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 15:15 IST

India-Brazil Trade Deal: पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष लुला यांच्यातील चर्चेनंतर ट्रेड डीलवर स्वाक्षरी!

India-Brazil Trade Deal: भारत आणि ब्राझीलमधील द्विपक्षीय संबंधांत आज एक नवा अध्याय जोडला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुइज इनासियो लुला डी सिल्वा यांच्यात झालेल्या उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चेनंतर भारत-ब्राझील ट्रेड डीलवर अधिकृत स्वाक्षरी करण्यात आली. या करारामुळे व्यापार, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील सहकार्याला नवी गती मिळणार आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा! 

पंतप्रधान मोदींकडून राष्ट्राध्यक्ष लुलांचे स्वागत

पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष लुला आणि त्यांच्या प्रतिनिधिमंडळाचे भारतात स्वागत करताना म्हटले, राष्ट्राध्यक्ष लुला आणि त्यांच्या प्रतिनिधिमंडळाचे भारतात स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. त्यांच्या दृष्टीकोनातून आणि प्रेरणादायी नेतृत्वातून भारत-ब्राझील संबंधांना दीर्घकाळ लाभ झाला आहे.

द्विपक्षीय भेटींमधून दृढ झाले संबंध

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत दोन्ही नेत्यांमध्ये अनेकदा भेटी झाल्या असून, प्रत्येक वेळी भारताबद्दल राष्ट्राध्यक्ष लुलांची मैत्री आणि विश्वास स्पष्टपणे दिसून आला आहे. त्यांनी पुढे नमूद केले की, राष्ट्राध्यक्ष लुलांचा हा दौरा ऐतिहासिक AI इम्पॅक्ट समिटला नवी ऊर्जा देणारा असून, भारत-ब्राझील स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अधिक मजबूत करणार आहे.

२० अब्ज डॉलर्सपलीकडे व्यापार वाढवण्याचे लक्ष्य

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, ब्राझील हा लॅटिन अमेरिकेतील भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. येत्या पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार २० अब्ज डॉलर्सपलीकडे नेण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला आहे. आमचा व्यापार केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर तो परस्पर विश्वासाचे प्रतीक आहे. राष्ट्राध्यक्ष लुलांसोबत आलेले मोठे व्यावसायिक प्रतिनिधिमंडळ या विश्वासाची साक्ष देत आहे.

तंत्रज्ञान, AI आणि ग्लोबल साउथवर भर

या बैठकीत AI, डिजिटल तंत्रज्ञान आणि स्टार्टअप इकोसिस्टममधील सहकार्यावर विशेष भर देण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले की, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषातील भागीदारी केवळ भारत आणि ब्राझीलपुरती मर्यादित नसून, संपूर्ण ग्लोबल साउथसाठी महत्त्वाची ठरू शकते. या सहकार्यामुळे विकासशील देशांना नव्या विकासदिशा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :भारतब्राझीलनरेंद्र मोदी