Join us

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 06:41 IST

अनुदान पात्र शाळांना वाढीव टप्पा घोषित करण्याच्या निर्णयाचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.

मुंबई :  राज्यातील शिक्षकशिक्षकेतरकर्मचारी यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, परंतु, शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे याची अंमलबजावणी रखडली होती. या निवडणुका पार पडताच याविषयीचा शासननिर्णय जारी करण्यात आला असून १ जानेवारी २०२३ पासून शिक्षकांना वाढीव मानधन मिळणार असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले. अनुदान पात्र शाळांना वाढीव टप्पा घोषित करण्याच्या निर्णयाचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.  

मराठी बाबत ग्रेडिंगचा पर्याय      शाळांमध्ये मराठी अनिवार्य केले आहे. मात्र ज्यांनी पहिली पासून मराठी शिक्षण घेतलेले नाही अशांना मराठी अडचणीचे ठरू शकते. यासाठी  ग्रेडिंगच्या पर्यायावर विचार सुरू असल्याचे केसरकर म्हणाले.

शिक्षकांचे सुधारित मानधन- प्राथमिक, उच्च प्राथमिक १६००० रु.- माध्यमिक     १८००० रु.- उच्च माध्यमिक, कनिष्ठ     महाविद्यालय     २०००० रु.- शिक्षकेतर कर्मचारी पूर्णवेळ मानधन     १४००० रु.- प्रयोगशाळा सहायक     १२००० रु.- कनिष्ठ लिपिक     १०००० रु.- चतुर्थ श्रेणी कर्मचारी     ८००० रु.

टॅग्स :शिक्षककर्मचारीसरकार