Union Budget
Lokmat Money > बिझनेस न्यूज > केवळ १२ नाही तर १५, २० ते ५० लाख रुपये कमावणाऱ्यांनाही मोठा फायदा; पूर्ण गणित समजून घ्या

केवळ १२ नाही तर १५, २० ते ५० लाख रुपये कमावणाऱ्यांनाही मोठा फायदा; पूर्ण गणित समजून घ्या

Tax Reliefs in Union Budget 2025 : मोदी सरकारने या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना सर्वात मोठा दिलासा दिला आहे. १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 13:37 IST2025-02-01T13:36:25+5:302025-02-01T13:37:19+5:30

Tax Reliefs in Union Budget 2025 : मोदी सरकारने या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना सर्वात मोठा दिलासा दिला आहे. १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे.

income tax budget 2025 no tax till 12 lakhs tax slabs benefits tax slabs rates | केवळ १२ नाही तर १५, २० ते ५० लाख रुपये कमावणाऱ्यांनाही मोठा फायदा; पूर्ण गणित समजून घ्या

केवळ १२ नाही तर १५, २० ते ५० लाख रुपये कमावणाऱ्यांनाही मोठा फायदा; पूर्ण गणित समजून घ्या

Tax Reliefs in Union Budget 2025 : शनिवारी (१ फेब्रुवारी २०२५) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात आयकर रचनेत मोठा बदल करण्यात आला आहे. आता १२ लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे. या उपायांमुळे करदात्यांना आणि मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. नवीन कर रचनेनंतर प्रत्यक्षात किती फायदा होणार? याबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत. आपण या गोष्टी सोप्या भाषेत समजून घेऊ.

१२ लाखांपर्यंत कर नाही
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना सर्वात मोठा दिलासा दिला आहे. आता १२ लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरण्याची गरज नाही. नवीन करप्रणाली अंतर्गत हा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी ७ लाख रुपयांच्या कमाईवर कोणताही कर भरावा लागत नव्हता. स्टँडर्ड डिडक्शन फक्त ७५,००० रुपये ठेवण्यात आले आहे. पण, १२ लाखांच्या पुढे उत्पन्न असलेल्या करदात्यांनाही अर्थमंत्र्यांनी दिलासा दिला आहे.

कोणत्या उत्पन्न गटाला किती टॅक्स 
० ते ४ - टॅक्स फ्री
४ ते ८- ५ टक्के
८ ते १२ लाख - १० टक्के
१२ ते १६ लाख - १५ टक्के
१६ ते २० लाख - २० टक्के
२० ते २४ लाख - २५ टक्के
२४ लाखापुढे - ३० टक्के

१२ लाखांच्या पुढेही मिळणार फायदा
मोदी सरकारने केवळ १२ लाख उत्पन्न असलेल्या करदात्यांनाच दिलासा दिलेला नाही. तर १२ लाख ते ५० लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या करदात्यांनाही मोठा दिलासा दिला आहे. १२ उत्पन्न असलेल्या करदात्याला ८० हजार रुपये फायदा मिळेल. तर १६ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या करदात्याला ५० हजार रुपयांचा फायदा होईल.     हेच उत्पन्न २० लाख रुपये झाले तर ९० हजार रुपयांची बचत होणार आहे. तर २४ लाखांचे वार्षिक उत्पन्न असलेल्यांचे आता १,१०,००० रुपये वाचतील. ५० लाखांपर्यंत कमावणारे करदाते १,१०,००० रुपये बचत करू शकतात.

आतापर्यंत काय होतं?
सध्या नवीन कर प्रणालीमध्ये ३ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही. तर ३ ते ७ लाख रुपयांच्या उत्पन्नावर ५ टक्के कर आकारला जातो. ७ ते १० लाख रुपयांच्या उत्पन्नावर १० टक्के कर भरावा लागतो. सध्या १० ते १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर १५ टक्के कर आकारला जातो..
 

Web Title: income tax budget 2025 no tax till 12 lakhs tax slabs benefits tax slabs rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.