Join us
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीत मन रमेना, २ लाखांत सुरू केलं स्टार्टअप; आज देशातील १५ शहरांत पसरलंय साम्राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 12:59 IST

EV Charging Business : विनीत एकेकाळी ३,५०० रुपये दरमहा पगाराची नोकरी करत होते. त्यानंतर त्यांनी ईव्ही स्टार्टअप एझीचार्जची स्थापना केली. आज त्यांच्या कंपनीने १५ शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन उभारले आहेत.

EV Charging Business : "जिद्द आणि चिकाटी असेल तर नशिबाचे चक्र बदलायला वेळ लागत नाही," हे वाक्य कानपूरच्या विनीत अस्थाना यांनी सत्यात उतरुन दाखवले आहे. एकेकाळी दिल्लीत अवघ्या ३,५०० रुपयांच्या तुटपुंज्या पगारावर नोकरी करणाऱ्या विनीत यांनी आज इलेक्ट्रिक व्हेईकल क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या 'EzyCharge' या स्टार्टअपच्या माध्यमातून त्यांनी देशातील १५ प्रमुख शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन्सचे जाळे विणले असून, हजारो तरुण उद्योजकांसाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत.

शिक्षणासाठी दिल्ली गाठली अन् प्रवासाला सुरुवात झालीविनीत मूळचे उत्तर प्रदेशातील 'औद्योगिक शहर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कानपूरचे आहेत. १९९७ मध्ये उच्च शिक्षणाच्या ध्येयाने त्यांनी दिल्ली गाठली. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी एका खाजगी कंपनीत ३,५०० रुपयांपासून नोकरीला सुरुवात केली. पुढे अनेक नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करताना त्यांनी तंत्रज्ञान, व्यवसाय व्यवस्थापन आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील बारकावे आत्मसात केले. याच काळात त्यांचा कल भविष्यकालीन 'इलेक्ट्रिक व्हेईकल' क्षेत्राकडे वळला आणि त्यांनी या क्षेत्राचा सखोल अभ्यास सुरू केला.

२ लाखांच्या भांडवलातून उभारले स्टार्टअपनोकरीत स्थिर स्थावर असतानाही स्वतःची कंपनी उभी करण्याचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. अखेर विनीत यांनी धाडसी निर्णय घेत नोकरी सोडली आणि केवळ २ लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून 'EzyCharge' ची स्थापना केली. ही कंपनी प्रामुख्याने इलेक्ट्रिक गाड्यांसाठी लागणारे चार्जिंग स्टेशन्स असेंबल करणे आणि ते विविध ठिकाणी स्थापित करण्याचे काम करते. विशेष म्हणजे, हे चार्जिंग स्टेशन सुलभपणे चालवण्यासाठी लागणारे अत्याधुनिक सॉफ्टवेअर देखील विनीत यांनी स्वतःच विकसित केले आहे.

वाचा - चांदीचा 'तिहेरी' धमाका! ३ लाखांचा टप्पा पार करत चांदीने रचला इतिहास; सोनेही दीड लाखाच्या उंबरठ्यावर

१५ शहरांत विस्तार; आता ५० शहरांचे लक्ष्यविनीत यांची मेहनत फळाला आली असून आज त्यांची कंपनी देशातील १५ शहरांमध्ये सक्रिय आहे. आयआयटी सारख्या देशातील नामवंत शैक्षणिक संस्थांमध्येही त्यांनी चार्जिंग स्टेशन्स यशस्वीरीत्या सेटअप केले आहेत. सुरुवातीला अत्यंत कमी पगारावर काम करणाऱ्या विनीत यांनी आज आपल्या स्टार्टअपला एका मोठ्या स्तरावर नेऊन ठेवले आहे. भविष्यात दरवर्षी ५० नवीन शहरांमध्ये चार्जिंग सुविधा पोहोचवण्याचे विनीत यांचे उद्दिष्ट असून, त्या दिशेने त्यांची वेगाने वाटचाल सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Jobless to EV empire: Startup booms in 15 Indian cities

Web Summary : Quitting a low-paying job, Vineet Asthana started 'EzyCharge' with ₹2 lakh. Now, his EV charging startup spans 15 cities. He provides charging stations and software, inspiring entrepreneurs nationwide with his success.
टॅग्स :व्यवसायइलेक्ट्रिक कार / स्कूटरइलेक्ट्रिक कार