Ahmedabad Air India Plane Crash: गुजरातमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेमुळे देशात शोककळा पसरली आहे. या अपघातात २४१ प्रवाशी मरण पावलेत तर सुदैवाने एकमेव प्रवासी बचावलाय. एअर इंडिया विमानानं टेकऑफ घेताच काही मिनिटांतच ही दुर्घटना झाली. एअर इंडियाचं विमान इतकं हायटेक टेक्नॉलॉजी आणि सेफ्टी फीचर होतं की संपूर्ण जगात पहिल्यांदाच या विमानाचा अपघात झालाय. एअर इंडियाच्या या विमानाचं मॉडेल बोईंग ड्रीमलाइन ७८७-८ आहे, जे २०११ पासून जगभरातील विमान कंपन्या वापरत आहेत. हे विमान हायटेक सेफ्टी फीचर्सनं सुसज्ज असून यापूर्वी कधीही क्रॅश झालं नव्हतं.
बोईंग कंपनीच्या म्हणण्यानुसार, मे २०२५ पर्यंत जगभरातून ७८७ ड्रीमलायनरसाठी २,१३७ ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत, त्यापैकी १,१८९ विमानांची डिलिव्हरी आधीच झाली आहे. आजपर्यंत यापैकी एकही विमान कोसळल्याची किंवा मोठ्या अपघाताला बळी पडण्याची घटना घडली नव्हती. या विमानाचे वय सुमारे ५० वर्षे असल्याचं सांगितले जात आहे.
कंपनीकडे किती ड्रिमलायनर?
एअर इंडिया आपल्या ताफ्यात ड्रीमलाइनर विमानांची संख्या झपाट्यानं वाढवत असून बोईंगला मोठी ऑर्डरही दिली आहे. सध्या कंपनीच्या ताफ्यात २० ड्रीमलाइनर असून कोसळलेलं विमान बोईंग ड्रीमलाइनर ७८७-८ मॉडेलचं आहे. या विमानाची अधिक प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. त्यामुळे इंधनाचीही बचत होते. त्यामुळेच एअर इंडियासह जगभरातील विमान कंपन्या आपल्या ताफ्यात ड्रीमलाइनरची भर घालत आहेत.
किती आहे किंमत?
बोईंग ७८७ ड्रीमलाइनरची किंमत मॉडेल, कॉन्फिगरेशन आणि कस्टमायझेशननुसार बदलते. बोईंग ७८७, ७८७-८, ७८७-९ आणि ७८७-१० असे तीन मुख्य प्रकार आहेत.
बोईंग ७८७-८ ची किंमत सुमारे २३९ दशलक्ष डॉलर (सुमारे २,०५५ कोटी रुपये) असू शकते. हे बेस मॉडेल आहे, जे २४८ प्रवासी वाहून नेऊ शकतं आणि ७,३०५ नॉटिकल मैल (१३,५२९ किमी) पर्यंत रेंज देतं. बोईंग ७८७-९ ची किंमत सुमारे २८ ० ते २९२ दशलक्ष डॉलर्स (सुमारे २,३२० कोटी ते २,४२० कोटी रुपये) पर्यंत असते. हे मोठं व्हेरिअंट आहे, जे २९६ प्रवासी वाहून नेऊ शकतं आणि ७,५६५ नॉटिकल मैल (१४,०१० किमी) रेंज प्रदान करतंबोईंग ७८७-१० ची किंमत सुमारे ३२५ दशलक्ष डॉलर (सुमारे २७०० कोटी रुपये) पर्यंत आहे. हे सर्वात मोठं व्हेरियंट आहे, ज्यात ३३६ प्रवासी प्रवास करू शकतात. मात्र त्याची रेंज ६,३३० नॉटिकल मैल (११,७२० किमी) आहे. मात्र, बोईंग अनेकदा मोठ्या ऑर्डरवर २० ते ४० टक्क्यांपर्यंत सूट देतं.