Join us

5 दिवस अन् ₹45000 कोटींची छप्परफाड कमाई...! HDFC ची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 18:25 IST

   टॉप-10 कंपन्यांपैकी एचडीएफसी बँक, टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेस, भारती एयरटेल, आयसीआयसीआय बँक, भारतीय स्टेट बँक, बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि आयटीसीच्या मार्केट व्हॅल्यूएशनमध्ये वाढ झाली आहे.

भारतीय शेअर बाजारासाठी गेला आठवडा जबरदस्त ठरला. या कालावधीत बीएसईचा सेन्सेक्स 509.41 अंक अथवा 0.66 टक्क्यांनी वधारला. दरम्यान, सेंसेक्सच्या टॉप-10 कंपन्यांपैकी 8 कंपन्यांच्या मार्केट व्हॅल्यूमध्येही जबरदस्त वाढ झाली. महत्वाचे म्हणजे, आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करण्याच्या बाबतीत एचडीएफसी बँक आघाडीवर राहिली. या कालावधीत एचडीएफसी बँकेचे मार्केट कॅप 44,933.62 कोटी (जवळपास 45 हजार कोटी) रुपयांनी वाढून 13,99,208.73 कोटी रुपयांवर पोहोचले.

गेल्या आठवड्यात सेंसेक्सच्या टॉप-10 सर्वात व्हॅल्यूएबल कंपन्यांपैकी 8 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये कंबाइंड 88,085.89 कोटी रुपयांची वाढ झाली. टॉप-10 कंपन्यांपैकी एचडीएफसी बँक, टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेस, भारती एयरटेल, आयसीआयसीआय बँक, भारतीय स्टेट बँक, बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि आयटीसीच्या मार्केट व्हॅल्यूएशनमध्ये वाढ झाली आहे.

या कंपन्यांचे गुंतवणूकदारही झाले मालामाल -भारतीय स्टेट बँकेचे मार्केट व्हॅल्यूएशन (बाजारमूल्य) 16,599.79 कोटी रुपयांनी वाढून 6,88,623.68 कोटी रुपये झाले. टीसीएसचे मार्केट कॅप 9,063.31 कोटी रुपयांनी वाढून 13,04,121.56 कोटी रुपयांवर पोहोचले. आयसीआयसीआय बँकेचे मार्केट कॅप 5,140.15 कोटी रुपयांनी वाढून 9,52,768.61 कोटी रुपयांवर पोहोचले. आईटीसीचे मार्केट कॅप 5,032.59 कोटी रुपयांनी वाढून 5,12,828.63 कोटी रुपयांवर आले. हिंदुस्तान युनिलीव्हरचे मार्केट कॅप 2,796.01 कोटी रुपयांनी वाढून 5,30,854.90 कोटी रुपयांवर आले. भारती एअरटेलचे बाजारमूल्य 2,651.48 कोटी रुपयांनी वाढून 9,87,005.92 कोटी रुपये झाले. बजाज फायनान्सचे मार्केट कॅप 1,868.94 कोटी रुपयांनी वाढून 5,54,715.12 कोटी रुपये झाले आहे.

गेल्या आठवड्यात या कंपन्यांना बसला फटका -इंफोसिसचे मार्केट कॅप 9,135.89 कोटी रुपयांनी कमी होऊन 6,52,228.49 कोटी रुपयांवर आले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप 1,962.2 कोटी रुपयांनी कमी होऊन 17,25,377.54 कोटी रुपयांवर आले.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकएचडीएफसी