Join us

HDFC Bank आणि SBI च्या गुंतवणूकदारांना धक्का! 'या' २ आयटी कंपन्यांनी केलं मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 12:46 IST

hdfc bank and sbi investors losses : गेल्या आठवड्यात सेन्सेक्समधील टॉप १० कंपन्यांचे बाजार भांडवल (मार्केट कॅप) १,६५,१८०.०४ कोटी रुपयांनी घटले आहे. गेल्या आठवड्यात एकूण 8 कंपन्यांचे मूल्यांकन घसरले, तर केवळ २ कंपन्यांनी त्यांच्या मार्केट कॅपमध्ये वाढ नोंदवली.

hdfc bank and sbi investors losses : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून भारतीय शेअर बाजारात पडझड थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे लाखो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेलेत. यामधून दिग्गज कंपन्यांही सुटल्या नाहीत. गेल्या आठवड्यात सेन्सेक्समधील टॉप १० कंपन्यांचे बाजार भांडवल (Market Cap) १,६५,१८०.०४ कोटी रुपयांनी घटले आहे. गेल्या आठवड्यात एकूण ८ कंपन्यांचे मूल्यांकन घसरले, तर केवळ २ कंपन्यांनी त्यांच्या मार्केट कॅपमध्ये वाढ नोंदवली. खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक आणि सार्वजनिक क्षेत्रातील एसबीआयला या घसरणीचा सर्वाधिक फटका बसला आहे.

HDFC बँक आणि SBI च्या गुंतवणूकदारांना मोठा फटकाया घसरणीत सर्वात जास्त नुकसान HDFC बँक आणि SBI ला झाले आहे. ज्यांचे मार्केट कॅप अनुक्रमे ४६,७२९.५१ कोटी रुपये ३४,९८४.५१ कोटी रुपयांनी घसरले. याव्यतिरिक्त हिंदुस्तान युनिलिव्हरचे मार्केट कॅप २७,८३०.९१ कोटी रुपयांनी घसरून ५,६१,३२९.१० कोटी रुपयांवर आले, तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल २२,०५७.७७ कोटी रुपयांनी घसरून १७,१५,४९८.९१ कोटी रुपयांवर आले.

TCS आणि इन्फोसिस मालामालभारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) चे मूल्यांकन ४,०७९.६२ कोटी रुपयांनी घसरून ५,७४,४९९.५४ कोटी रुपये झाले तर ICICI बँकेचे मूल्यांकन २,८३२.३८ कोटी रुपयांनी घसरून ८,८५,५९९.६८ कोटी रुपये झाले. इन्फोसिसचे बाजार भांडवल १३,६८१.३७ कोटी रुपयांनी वाढून ७,७३,९६२.५० कोटी रुपये झाले. याशिवाय टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (TCS) मार्केट कॅप ४१६.०८ कोटी रुपयांनी वाढून १५,००,११३.३६ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.

10 टॉप कंपन्यादेशांतर्ग रिलायन्स इंडस्ट्रीज ही सर्वात मूल्यवान कंपनी आहे. त्यानंतर TCS, HDFC बँक, ICICI बँक, भारती एअरटेल, इन्फोसिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, ITC, LIC आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचा क्रमांक लागतो.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारएचडीएफसीस्टेट बँक आॅफ इंडिया