Join us
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी बदलांचा ईव्हीला फटका, लोक पुन्हा पेट्रोलकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 07:38 IST

नव्या कररचनेमुळे इलेक्ट्रिक आणि पेट्रोल-डिझेल गाड्यांच्या किमतीतील तफावत

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: देशातील लक्झरी कार सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) वाढत्या प्रभावाला ‘जीएसटी २.०’ सुधारणांनंतर ब्रेक लागल्याचे चित्र आहे. नव्या कररचनेमुळे इलेक्ट्रिक आणि पेट्रोल-डिझेल गाड्यांच्या किमतीतील तफावत वाढल्याने, लक्झरी ईव्हीच्या विक्रीत सुमारे ३ टक्क्यांची घट झाली आहे. 

आता ग्राहकांसाठी आयसीई इंधन म्हणजेच पेट्रोलवरील गाड्या अधिक परवडणाऱ्या ठरत आहेत. जीएसटी सुधारणांनंतर मध्यम व सुरुवातीच्या लक्झरी सेगमेंटमध्ये मोठे बदल झाले आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : GST Changes Impact EVs; Consumers Shift Back to Petrol Cars

Web Summary : GST 2.0 reforms have slowed electric vehicle adoption in the luxury car segment. Increased price differences favor petrol cars, causing a 3% drop in luxury EV sales. ICE vehicles are now more affordable for consumers.
टॅग्स :इलेक्ट्रिक कार / स्कूटरइलेक्ट्रिक कारपेट्रोलजीएसटी