Join us  

करदात्यांना मोठा दिलासा, आयटीआर दाखल करण्याची मुदत वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 7:52 AM

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) ने इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याच्या अंतिम तारखेची मुदत वाढवली आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड सीबीडीटीने  २०१८-१९ (एवाय २०१९-२०) साठी प्राप्तिकर रिटर्न भरण्याची तारीख वाढवली यापूर्वी प्राप्तिकर परतावा भरण्यासाठी ३१ जुलै २०२० ही अंतिम तारीख होतीआता ही मुदत वाढवून  ३० सप्टेंबर २०२० पर्यंत करण्यात आली आहे

नवी दिल्ली -  कोरोना विषाणूच्या फैलावामुळे देशावर आलेले संकट अद्याप कमी झालेले नाही. दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे अनेक क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) ने इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याच्या अंतिम तारखेची मुदत वाढवली आहे.  ही मुदत ३१ जुलै २०२० रोजी संपुष्टात येत होती.

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड सीबीडीटीने  २०१८-१९ (एवाय २०१९-२०) साठी प्राप्तिकर रिटर्न भरण्याची तारीख वाढवली आहे. यापूर्वी प्राप्तिकर परतावा भरण्यासाठी ३१ जुलै २०२० ही अंतिम तारीख होती. मात्र आता ही मुदत वाढवून  ३० सप्टेंबर २०२० पर्यंत करण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वी दोनदा आयटीआर दाखल करण्याची मुदत वाढवण्यात आलेली आहे.  

प्राप्तिकर विभागाने ट्विट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे. कोविडच्या साथीमुळे येत असलेल्या अडथळे आणि करदात्यांना अधिक सुलभपणे नियमांचे पालन करता यावे म्हणून सीबीडीटीने २०१८-१९ (एवाय २०१९-२०) साठी प्राप्तिकर परतावा भरण्यासाठीची मुदत ३१ जुलैपासून वाढवून ३० सप्टेंबर २०२० पर्यंत केली आहे, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 दरम्यान, गेल्या काही काळात सीबीडीटीने प्राप्तिकर परतावा भरण्याची मुदत तिसऱ्यांदा वाढवली आहे. यापूर्वी आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी ३१ मार्च २०२० पर्यंत प्राप्तिकर परतावा भरण्याची मुदत देण्यात आली होती. पुढे ही मुदत ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली. त्यानंतर त्यात पुन्हा वाढ करून ३१ जुलैपर्यंतची मुदच देण्यात आली होती. आता ही मुदत ३० सप्टेंबर करण्यात आली आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला 

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल 

टॅग्स :इन्कम टॅक्सकरकोरोना वायरस बातम्याअर्थव्यवस्थाभारत