Join us
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी बँक कर्मचाऱ्यांना मोठी खूशखबर, पगारात घसघशीत वाढ, इन्सेंटिव्हसुद्धा मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 09:40 IST

सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनात १५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच त्यांना कामगिरीच्या आधारावर इन्सेंटिव्हही देण्याता येणार आहे. ही पगारवाढ १ नोव्हेंबर २०१७ पासून लागू असेल.

ठळक मुद्देसरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनात १५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णयकामगिरीच्या आधारावर इन्सेंटिव्हही देण्यात येणार नोव्हेंबर २०१७ पासून वाढ होण्यापासून पगारात वाढ होत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना एरियसच्या रूपात घसघशीत रक्कम मिळणार

नवी दिल्ली - कोरोना विषाणू्च्या फैलावामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे सध्या सर्वच क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात होत आहे. मात्र या परिस्थितीत सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आली आहे. सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनात १५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच त्यांना कामगिरीच्या आधारावर इन्सेंटिव्हही देण्यात येणार आहे. ही पगारवाढ १ नोव्हेंबर २०१७ पासून लागू असेल.

नोव्हेंबर २०१७ पासून वाढ होण्यापासून पगारात वाढ होत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना एरियसच्या रूपात घसघशीत रक्कम मिळणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांची वेतन वाढ ही गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित होती. या पगारवाढीसाठी बँक युनियन आणि इंडियन बँक असोसिएशन यांच्यात बुधवारी अकराव्या फेरीतील बैठक समाप्त झाली. त्यानंतर एक करार झाला आहे.

दरम्यान, ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार ३१ मार्च २०१७ पासूनच्या हिशोबानुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनात १५ टक्क्यांची वाढ होणार आहे. त्यामुळे बँकांना सुमारे सात हजार ९८८ कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे.

 यापूर्वी २०१२ मध्ये आयबीएने कर्मचाऱ्यांच्या पगारात १५ टक्क्यांनी वाढ केली होती. आता २०१७ ते २०२२ या पाच वर्षांसाठी बँक युनियनने २० टक्के इंक्रिमेंटची मागणी केली होती. तर आयबीएने आपल्याकडून १२.२५ टक्के पगारवाढीचा प्रस्ताव दिला होता. अखेर १५ टक्क्यांवर एकमत झाले.

पगारवाढीच्या मुद्यावर बँकांचे व्यवस्थापन आणि कर्मचारी युनियनमध्ये गेल्या दोन वर्षांपासून चर्चा सुरू होती. तसेच मागण्या मान्य न झाल्यास संप करण्याचा इशारा युनियनने दिला होता. तसेच आता कर्मचाऱ्यांना कामगिरीच्या आधारावर इन्सेंटिव्ह सुरू करण्यावरही सहमती झाली आहे. हा इन्सेंटिव्ह विविध बँकांसाठी नफ्याच्या आधारावर आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल 

धक्कादायक! कोरोनाच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी ५० हून अधिक मुलांना पाजली देशी दारू

नवीन नोकरी शोधताय? मग अजिबात करू नका या चुका, अन्यथा येईल पश्चातापाची वेळ

 महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही

…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान

coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी

गेल्या सहा महिन्यांत कोरोनाबाबत तज्ज्ञांना मिळाली ही महत्त्वाची माहिती, लस आणि हर्ड इम्युनिटीबाबत मिळाले असे संकेत…

टॅग्स :बँकिंग क्षेत्रबँककर्मचारीव्यवसाय