Google Employee Salary: सामान्यतः नोकरी ही केवळ कर्मचाऱ्यापुरती मर्यादित मानली जाते, परंतु जगातील आघाडीच्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या गुगलसाठी कर्मचारी हा केवळ एक असेट नसून कुटुंबाचा भाग आहे. कंपनी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या कुटुंबाची काळजी घेते आणि आर्थिक मदत सुरू ठेवते. गुगलची मूळ कंपनी 'अल्फाबेट' ही मार्केट कॅपच्या दृष्टीनं जगातील तिसरी मोठी कंपनी आहे. या शर्यतीत तिच्यापुढे केवळ एनवीडिया (Nvidia) आणि ॲपल (Apple) आहेत. जगभरात गुगलच्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे १,९०,८०० इतकी आहे.
१० वर्षांपर्यंत अर्धा पगार
ईटीच्या वृत्तानुसार, गुगलच्या या धोरणांतर्गत जर एखाद्या कर्मचाऱ्याचं निधन झालं, तर त्याच्या जोडीदाराला पुढील १० वर्षांपर्यंत त्याच्या पगाराच्या सुमारे ५०% रक्कम दिली जाते. विशेष म्हणजे, या सुविधेचा लाभ घेण्यासाठी दीर्घकाळ नोकरी करणं आवश्यक नाही; कर्मचारी कंपनीत रुजू झाल्यापासूनच ही सुविधा लागू होते.
सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
मुलांना भक्कम आर्थिक आधार
कंपनी कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या भविष्याकडेही दुर्लक्ष करत नाही. कर्मचाऱ्याच्या प्रत्येक मुलाला दरमहा सुमारे १००० डॉलर (सुमारे ८० हजार रुपये) आर्थिक मदत दिली जाते. मुलांचं शिक्षण आणि इतर गरजा प्रभावित होऊ नयेत म्हणून मुलांच्या एका ठराविक वयापर्यंत ही मदत सुरू राहते.
शेअर्सचं ट्रान्सफर
या धोरणाचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, कर्मचाऱ्याला भविष्यात मिळणारे कंपनीचे शेअर्स त्वरित त्याच्या कुटुंबाच्या नावावर ट्रान्सफर केले जातात. यामुळे कुटुंबाला एकाच वेळी मोठी आर्थिक मदत मिळते आणि त्यांची आर्थिक सुरक्षा अधिक मजबूत होते.
कॉर्पोरेट क्षेत्रातील एक आदर्श उदाहरण
कॉर्पोरेट क्षेत्रात अशा प्रकारच्या सुविधा खूप कमी पाहायला मिळतात, म्हणूनच गुगलचे हे धोरण नेहमी चर्चेत असतं. कंपन्यांनी ठरवलं तर त्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी एक सुरक्षित वातावरण कसं निर्माण करू शकतात, याचं हे उत्तम उदाहरण आहे.
Web Summary : Google provides exceptional support, offering the deceased employee's partner 50% of their salary for ten years. They also give $1000 monthly per child and transfer shares, ensuring financial security. This sets a high standard in corporate care.
Web Summary : गूगल अपने कर्मचारियों के परिवारों को असाधारण सहायता प्रदान करता है। कर्मचारी के निधन के बाद, उनके जीवनसाथी को दस साल तक 50% वेतन, बच्चों को प्रति माह $1000 और शेयर ट्रांसफर करता है, जिससे आर्थिक सुरक्षा सुनिश्चित होती है। यह कॉर्पोरेट देखभाल में एक उच्च मानक स्थापित करता है।